मुख्यमंत्री अन् प्रदेशाध्यक्ष भिडले; चन्नींची राजीनामा देण्याची तयारी...सिध्दूंना दिलं आव्हान

पंजाब काँग्रेसवरील संकट अजूनही टळलेले नाही.
Charanjit Singh Channi and Navjot Singh Sidhu
Charanjit Singh Channi and Navjot Singh SidhuFile Photo

नवी दिल्ली : एकीकडे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी काँग्रेस सोडून स्वतंत्र चूल मांडण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे पंजाब काँग्रेसवरील (Punjab Congress) संकट अजूनही टळलेले नाही. आता प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू (Navjot Singh Sidhu) आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (CharanJit Singh Channi) यांच्यामधील वाद वाढला असल्याचे समोर आले आहे. या वादात चन्नी यांनी थेट राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असून सिध्दू यांना थेट आव्हान दिलं आहे.

चन्नी यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडल्यापासून सिध्दू नाराज असल्याचे बोलले जात आहे. चन्नी यांच्या शपथविधीनंतर काही दिवसांतच त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. पण पक्षश्रेष्ठींनी त्यांचा राजीनामा मंजूर केला नाही. अखेर मागील आठवड्यात त्यांनी तलवार म्यान केली. पण त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना भलमोठं पत्र लिहित पंजाबशी संबंधित 13 मुद्यांवर त्यांचं लक्ष वेधलं. तसेच राज्य सरकारला निर्देश देण्याची मागणीही केली होती.

Charanjit Singh Channi and Navjot Singh Sidhu
अमरिंदरसिंग यांचं ठरलं! भाजपसोबत जाणार पण एका अटीवर...

सिद्धू यांच्या या पत्रावरच रविवारी रात्री महत्वाची बैठक झाल्याचे समजते. या बैठकीतच सिध्दू आणि चन्नी एकमेकांना भिडल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. चंदीगड येथील राज्यपाल भवनच्या गेस्ट हाऊसमध्ये ही बैठक झाली. काँग्रेसचे पर्यवेक्षक हरीश चौधरी आणि प्रदेश महासचिव परगट सिंह आदी या बैठकीला उपस्थित होते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत सिध्दू यांनी पत्रातील तेरा मुद्दे उपस्थित केले. त्यावर चन्नी यांनी आपल्याकडे केवळ 60 दिवस राहिले आहेत, असं सांगत हे मुद्दे सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे स्पष्ट केलं. पण त्यानंतरही सिध्दू एक-एक मुद्दा घेऊन चन्नी यांना विचारतच होते. त्यावर चिडलेल्या मुख्यमंत्र्यांनी थेट राजीनामा देण्याची तयारी दर्शवत सिद्धूंना आव्हान दिलं. दोन महिन्यांमध्ये या 13 मुद्यांवर कारवाई करून दाखवावी, असं चन्नी सिध्दूंना म्हणाल्याचे समजते. सिध्दू हे चन्नी यांच्यावर बादल परिवाराच्या व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी दबाव टाकत असल्याचे वृत्त आहे.

Charanjit Singh Channi and Navjot Singh Sidhu
आर्यनच्या जामिनासाठी भाजप नेत्यानं केली प्रार्थना अन् शुभेच्छाही...

या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांना सिध्दू यांच्याविषयी विचारले असता थेट सिध्दू यांना इथे बसवू, असे ते म्हणाले होते. चन्नी यांनी सिध्दू यांना इशाराही दिला आहे. तेराच काय पण 18, 21 किंवा 24 मुद्दे असले तरी ते लागू केले जातील. सिध्दू हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांकडे मुद्दे मांडले असून त्यात काहीच चूक नाही. मुद्ये सोडविले जातील. पण पक्षच मोठा आहे, असं सांगत चन्नी यांनी सिध्दूंना एकप्रकारे इशारा दिल्याचे मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com