

Karnataka Politics : कर्नाटक नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे पाच उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत भाजप आणि जेडीएसच्या ११ आमदारांनी क्रॉस वोटिंग केले. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या रणनीतीमुळे काँग्रेसला हा विजय मिळाल्याची चर्चा आहे.
विधानपरिषदेतील विजयानंतर शिवकुमार यांनी आता २०२८ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे आपला मोर्चा वळविला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवे मंत्रालय स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. प्रजा सेवक विभाग असे या मंत्रालयाचे नाव असणार आहे. त्यासाठी स्वतंत्र मंत्री आणि आयएएस अधिकारीही असतील.
या निर्णयाविषयी माहिती देताना शिवकुमार यांनी सांगितले की, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील जनतेच्या तक्रारी आणि समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र मंत्री असतील. विभागाच्या बैठकांना मंत्री उपस्थित राहतील, तसेच आमदारांनाही या बैठकांमध्ये सहभागी होता येणार आहे.
राज्यातील सर्व मंत्र्यांना प्रत्येक आठवड्यात किमान एक दिवसतरी एका तालुक्यात जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. तालुक्यात जाऊन तेथील लोकांना भेटून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या जातील. कोणत्या तक्रारींसाठी लोकांना बेगळुरूमध्ये येण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे शिवकुमार यांनी स्पष्ट केले.
नव्या विभागाचे नाव ‘प्रजा सेवक विभाग’ असे असेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. प्रत्येक आमदारही प्रत्येक घरापर्यंत पोहोचतील, यावरही आपले लक्ष असेल, असे सांगत शिवकुमार यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरूवात केल्याचे दिसते. त्यानुसार आमदार, मंत्र्यांना आता थेट गावागावात, तालुक्यात जाऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्या लागणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.