Operation Tiger : मोठी बातमी : अखेर बंडखोर खासदाराकडूनच 'ऑपरेशन टायगर'वर शिक्कामोर्तब; शिवसेनेत गेल्याचे केलं जाहीर...

Nagesh Patil Ashtikar, Operation Tiger : ओमराजे निंबाळकर हे आज सायंकाळी किंवा सोमवारी आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena UBT Crisis : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असताना मोठी घडामोड घडली आहे. बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बंडखोरी केल्याचे कारण सांगत शिवसेनेत गेल्याचेही जाहीर केले आहे. अद्याप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपला निर्णय जाहीर केलेला नाही. त्याआधीच आष्टीकर यांनी या बंडावरील पडदा उघडला आहे.

खासदार आष्टीकर यांचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यांनी मागील काही दिवसांतील घडामोडींवर पहिल्यांदाच भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी कुणावरही नाराज होऊन गेलेलो नाही. उद्धवसाहेबांवर तर मुळीच नाराजी नाही. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. राऊतसाहेब किंवा इतर मोठी मंडळी बोलत असतील तर तो त्यांचा हक्क आहे. ते माझ्या वडिलांप्रमाणे आहेत, मला त्याचे वाईट वाटणार नाही. आम्ही १८ तारखेपर्यंत कुणीच कुठे गेलो नव्हतो. पण ज्यापध्दतीचे गैरविश्वास किंवा बोलण्याचा अतिरेक झाला, त्यानंतर बऱ्याचशा मंडळींनी विचार केला की, आता ती थांबूनही काही अर्थ नाही.

आष्टीकर पुढे म्हणाले आहे की, खरं सांगायचं तर, आपण सर्वांना माहिती आहे की, खूप दिवसांपासून आपण पाहतोय की सत्तेशिवाय कार्यकर्त्यांची कामे होत नाही. हेही मी पाऊल उचलण्यामागचे मोठे कारण असू शकतो. लोकांनी मला मोठ्या आशेने निवडून दिले आहे. मला त्यांची कामे करणे क्रमप्राप्त आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारची निधी मिळत नाही. पाच खोटींचा खासदार निधी अत्यंत अपुरा आहे. मी लोकांची कामे कशी करायची, निधी कुठून मिळवायचा. कामे होत नव्हती. त्यामुळे हे पाऊल उचलले. कदाचित बऱ्याच जणांना हे पटले असेल, अनेकांना पटलेही नसेल.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Omprakash Rajenimbalkar news : ओमराजेंची खदखद पहिल्यांदाच आली बाहेर; म्हणाले, मी खरंच इतका वाईट आहे का, आमची हेटाळणी का झाली?

जनतेने माझ्यावर खूप प्रेम केले आहे. मी दोन वर्षांपासून प्रयत्न करतोय. पण कामे करायची असतील, निधी आणायचा असेल तर सत्तेत जाणे क्रमप्राप्त आहे. ज्यांना कळालं असेल की मी का गेलो, ते लक्षात घेतील. वडिलांनी राजकारण थांबविल्यापासून तुम्ही मला ओळखता. तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात. पण कामे होत नसल्याने बरचेसे कार्यकर्ते पक्ष सोडून जावे लागले. त्यामुळे मी निर्णय घेतला असेल. माझ्या कामातून मी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करेन. मला जशी आधी साथ दिली, तशीच आताही दिली, असे आवाहनही आष्टीकर यांनी केले.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
MP Sanjay Jadhav news : परभणीत दुर्घटना, खासदार संजय जाधव सध्या कुठे आहेत? व्हिडिओ पोस्ट करत म्हणाले, सहकार्य करा...

मी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा विचार करून गेलो. मी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन. माझ्यावर विश्वास ठेवा, विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मी कुठेही गेलेलो नाही, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलो आहे. विचारधारा सोडलेली नाही, असा आष्टीकर यांनी जाहीर केले. त्यामुळे एकप्रकारे सहा खासदारांच्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब झाले आहे. आष्टीकर यांनी शिवसेनेत गेलो असल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com