DK Shivakumar news : शिवकुमारांसमोर मोठं संकट; मुख्यमंत्री होताच अदानींची फाईल आडवी येणार, राहुल गांधींना अडचणीत आणणार?

Bengaluru tunnel road project, Adani Group Karnataka : शिवकुमार हे उपमुख्यमंत्री आणि बेंगलुरू डेव्हलपमेंट मंत्री असताना हा १७ हजार ६९८ कोटी रुपयांचा पीपीपी मॉडेलवरील प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू झाली होती.
Rahul Gandhi, DK Shivakumar
Rahul Gandhi, DK Shivakumar Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka politics : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार हे बुधवारी शपथ घेतील. काँग्रेस पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या शिवकुमार यांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. मात्र, शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर पक्षाचे नेते राहुल गांधी यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणणारा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते.

बेंगलुरू टनेल रोड प्रोजेक्ट हा शिवकुमार यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. त्यांच्या पुढाकारातूनच शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये जवळपास १७ किलोमीटरचा रस्ता भूयारी असणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, या प्रकल्प उभारणीच्या कामाची निविदा अदानी ग्रुपने जिंकली आहे. याबाबतची फाईल मुख्यमंत्र्‍यांच्या टेबलवर आहे.

राहुल गांधी हे सातत्याने अदानी ग्रुपवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत असतात. पंतप्रधान मोदींमुळे गौतम अदानी यांना देशातील अनेक कंत्राटे मिळत असल्याचा आरोप राहुल यांच्याकडून केला जात आहेत. यापार्श्वभूमीवर शिवकुमार यांच्यासमोर आता संकट उभे ठाकणार आहे.

Rahul Gandhi, DK Shivakumar
Cockroach Janata Party : अभिजीत दीपकेंनी टाकला बॉम्ब; कॉक्रोच जनता पार्टीकडून मोदी सरकारविरोधात दिल्लीतील पहिल्या आंदोलनाची घोषणा

शिवकुमार हे उपमुख्यमंत्री आणि बेंगलुरू डेव्हलपमेंट मंत्री असताना हा १७ हजार ६९८ कोटी रुपयांचा पीपीपी मॉडेलवरील प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू झाली होती. अदानी एंटरप्रायझेस कंपनीने निविदा प्रक्रियेत सहभागी होत ती जिंकली आहे. आता नव्या कॅबिनेटसमोर त्याला मान्यता द्यावी लागेल.

शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटने अदानींच्या कंपनीला प्रकल्पाचे काम बहाल केल्यास काँग्रेस आणि राहुल गांधींची मोठी राजकीय कोंडी होऊ शकते. राहुल गांधी यांना नाराज न करण्याचा निर्णय घेतल्यास शिवकुमार यांचा ड्रीमप्रोजेक्ट लांबणीवर पडू शकतो. परिणामी, बेंगलुरूमधील नागरिकांचा रोषही त्यांच्यावर ओढवू शकतो. अशा दुहेरी कात्रीत शिवकुमार अडकण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi, DK Shivakumar
Rahul Gandhi news : राहुल गांधींचा एक फोन अन् एक पोस्ट, काँग्रेसला मिळणार 100 हत्तींचे बळ

अन्य राज्यांत काय स्थिती?

काँग्रेसची सत्ता असलेल्या तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातही काही प्रकल्पांचे काम अदानींच्या कंपन्यांकडे आहे. मात्र, त्यानंतरही राहुल गांधींकडून अदानींच्या खांद्यावर बंदूक ठेवत पंतप्रधानांवर टीका केली जात आहे. राहुल गांधी यांच्याकडून याबाबत त्यांच्या सरकारचे कधी उघडपणे कान उपटल्याचे दिसले नाही. त्यामुळे शिवकुमार यांना फारशी अडचण येणार नाही, अशीही चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com