S S shivshankar : इंडिया आघाडीतील नेत्याचे भगवान रामावर वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, 'अस्तित्व सिद्ध...'

S S shivshankar DMK bhagwan ram : घोटाळ्यात अडकलेले परिवहन मंत्री शिवशंकर भगवान रामाचे अस्तित्व नाकारत आहेत. मात्र त्यांचेच एक मंत्री रामाचे अस्तित्व मान्य करतात, असे भाजप नेते अण्णामलाई म्हणाले.
S S shivshankar
S S shivshankarsarkarnama
Published on
Updated on

s s shivshankar News : इंडिया आघाडीतील सहयोगी पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) मधील नेत्याने भगवान रामाच्या अस्तित्वाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.एसएस शिवशंकर असे या नेत्याचे नाव असून ते तामिळनाडू सरकारमध्ये मंत्री देखील आहेत.

'आमच्या इतिहासात भगवान रामाचे अस्तित्व सिद्ध करण्याचा कोणताही पुरावा नाही.', असे एसएस शिवशंकर चोल वंशाचे राजे राजेंद्र चोल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात म्हणाले.

'आपण महान राजा राजेंद्र चोल यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली पाहिजे. राजेंद्र चोल यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी बांधलेल्या विहिरी आहेत. ज्यावर त्यांचे नाव लिहिलेले आहे. राजेंद्र चोल अस्तित्वात असल्याचे पुरावे आपल्या इतिहासात आहेत. परंतु, प्रभू रामाच्या अस्तित्वाबाबत आपल्या इतिहासात कोणताही भक्कम पुरावा नाही.', असे डीएमकेचे मंत्री शिवशंकर म्हणाले.

S S shivshankar
Gyandev Ahuja : गोहत्या झाली म्हणून वायनाडमध्ये भूस्खलन, भाजप नेत्याचा अजब दावा

'काही लोक म्हणतात की राम अवतार होता. आणि अवतार कधीच जन्म घेऊ शकत नाही. आपला इतिहास लपवून या गोष्टी विकृत स्वरूपात आपल्यासमोर मांडल्या जातात', असे देखील शिवशंकर म्हणाले

भाजपचा पलटवार

भाजपने एसएस शिवशंकर यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे. तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अण्णामलाई म्हणाले,घोटाळ्यात अडकलेले परिवहन मंत्री शिवशंकर भगवान रामाचे अस्तित्व नाकारत आहेत. हा सर्व प्रकार चोल राजवटीचा इतिहास पुसून टाकण्याचा डाव असल्याचा दावा ते करत आहेत. मात्र ते भ्रमिष्ठ झाले आहेत. त्यांचे एक मंत्री रामाचे अस्तत्वि मान्य करतात आणि शिवशंकर अमान्य करतात. त्या दोघांनी एकत्र बसून काय ते ठरवावे.

S S shivshankar
Narayan Rane On Jarange Patil: 'मराठवाड्यात जाणार अन्...' नारायण राणे विरुद्ध मनोज जरांगे वाद पुन्हा पेटणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com