Pune News : अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (ता.20) शपथ घेतली. यावेळी त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. तसेच ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनिया निवडणूक रॅलीदरम्यान त्यांचे प्राण वाचवणाऱ्या शॉन करन यांची एका मोठ्या पदावर नियुक्ती केली आहे. शॉन करन यांची अमेरिकन गुप्तहेर सेवेच्या संचालक (प्रमुख) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनिया निवडणूक रॅलीदरम्यान यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. 13 जुलै रोजी ते येथील बटलर शहरात रॅलीला संबोधित करत होते. त्यावेळी 20 वर्षीय थॉमस क्रुक्स या हल्लेखारोने AR-15 रायफलमधून 8 गोळ्या झाडली होत्या. यातील एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गोळी गेली होती. यावेळी त्यांच्या अंगरक्षकातील शॉन करन याने हल्लेखोराला ठार केले होते. त्यावेळी या हल्ल्याचा निषेध जगभरात करण्यात आला होता.
दरम्यान सोमवारी ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. यावेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनी शॉन करन यांच्या नावाची घोषणा केली. तसेच शॉन करन, गेल्या अडीच वर्षांपासून सातत्याने ट्रम्प यांचा बचाव करत आहेत, असे म्हटले. या घोषणेनंतर ट्रम्प यांना बरीच टीका सहन करावी लागत आहे.
शॉन करन हा खरा अमेरिकन आणि देशभक्त आहे. या पदावर राहण्यासाठी त्यांच्यापेक्षा चांगला दुसरा कोणी असू शकत नाही. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यापूर्वीही शॉन करन याने त्यांची सुरक्षा वाढवण्याबद्दल बोलले होते. तथापि, त्यावेळी एजन्सीने त्यांचे शब्द गांभीर्याने घेतले नाहीत.
शॉन करन यांना गुप्त सेवा संचालक म्हणून नियुक्त केल्याबद्दल ट्रम्प यांना बरीच टीका सहन करावी लागत आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयावर रिपब्लिकन पक्षाचे सदस्यही प्रश्न उपस्थित करत आहेत. अनेकांचा असा विश्वास आहे की, शॉन करन सिक्रेट सर्व्हिससारख्या संघटनेचं नेतृत्व करण्याचा अनुभव नाही. त्याचे संचालक होणे महत्त्वाच्या लोकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करेल. ही एजन्सी अमेरिकेतील उच्च प्रोफाइल लोकांना सुरक्षा प्रदान करते.
13 जुलै 2024 रोजी एका रॅलीदरम्यान रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर, 15 सप्टेंबर 2024 रोजी, फ्लोरिडा येथील त्यांच्या गोल्फ कोर्सवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा आणखी एक प्रयत्न झाला, जो अयशस्वी झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.