Donald Trump : गोळी खायलाही तयार होती! ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर आधार देणारी महिला पुन्हा चर्चेत

Donald Trump Survives Assassination Attempt : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मागील वर्षी 13 जुलैला एका प्रचारसभेदरम्यान हल्ला झाला होता. त्यावेळी त्यांच्याजवळ उभी असलेले महिला सिक्रेट एजंटने दिलेल्या आधाराचा फोटो समोर आला होता.
Donald Trump
Donald TrumpSarkarnama
Published on
Updated on

Who is the Heroic Secret Service Agent? : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जीवघेणा हल्ला झाला होता. हल्लेखोराने झालेली गोळी त्यांच्या कानाला लागून गेली होती. या हल्ल्यात ट्रम्प थोडक्यात बचावले. त्यानंतर एका महिलेने तातडीने ट्रम्प यांना खांद्याचा आधार देत सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी धडपड केली होती. आता हीच महिला पुन्हा चर्चेत आली आहे.

ट्रम्प यांच्यावर मागील वर्षी 13 जुलैला एका प्रचारसभेदरम्यान हल्ला झाला होता. त्यावेळी त्यांच्याजवळ उभी असलेले महिला सिक्रेट एजंटने दिलेल्या आधाराचा फोटो समोर आला होता. इतर सुरक्षारक्षकांनीही त्यांना घेरले होते. पण या महिला एजंटचे खूप कौतुक झाले होते. या महिलेने ट्रम्प यांचा जीव वाचवला होता. ट्रम्प यांनीही त्यांचे कौतुक केले होते.

पुन्हा का चर्चेत?

ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला तेव्हा सीन कुरेन हे त्यांच्या सुरक्षा टीमचे नेतृत्व करत होते. महिलेसोबतच्या फोटोमधील दोन इतर पुरूष एजंटमध्ये कुरेन हेही दिसतात. त्यांना आता सीक्रेट सर्व्हिसचे संचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबत नुकतीच घोषणा करण्यात आली. तसेच इतर सुरक्षा टीममधील इतर सहा एजंट्सला विना वेतन निलंबित करण्यात आले आहे.

Donald Trump
Trump Vs Putin : संतापलेल्या ट्रम्प यांचा पुतीन यांना झटका; 2 मोठ्या घोषणा, रशियाने उडवली खिल्ली...

निलंबित करण्यात आलेले सर्वजण ट्रम्प यांच्या रॅलीच्या ठिकाणी उपस्थित होते. विशेष म्हणजे फोटोमध्ये दिसत असलेल्या तिघांपैकी ज्यामध्ये महिला एजंटही आहे, त्यांना निलंबित करण्यात आलेले नाही. त्यामुळेच या महिला एजंटची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. ट्रम्प यांचे त्यावेळचे विश्वासू आणि उद्योगपती इलॉन मस्क यांनी संबंधित महिला एजंटच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली होती.

Donald Trump
Nimisha Priya’s Case : मोठी बातमी : निमिषा प्रिया यांची उद्याची फाशी टळली; भारताला मोठं यश, नेमकं काय घडलं?

ट्रम्प यांची उंची 6 फूट 3 इंच असून त्यांच्या सुरक्षेसाठी संबंधित महिला एजंट खूप छोटी आहे. एका मोठ्या व्यक्तीचे शरीर झाकण्यासाठी एका छोट्या व्यक्तीचे असणे म्हणजे समुद्रकिनारी एका छोट्या आकाराच्या स्पीडोसारखे आहे, अशी खिल्ली मस्क यांनी उडवली होती. तर ट्रम्प यांनी महिला एजंटचे तोंडभरून कौतुक केले होते. हल्ल्यानंतर दोन आठवड्यांनी बोलताना ट्रम्प म्हणाले होते की, माझ्या उजव्या बाजूला एक महिला मला वाचवत होती. एक खूप सुंदर व्यक्ती. शक्य तेवढे प्रयत्न करून ती मला वाचवत होती. ती गोळी खाण्यासाठीही तयार होती. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com