
Impact on U.S. Foreign Policy and Indo-American Relations : मागील काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. ऑपरेशन सिंदूरवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केलेली जात असलेली विधान आणि त्यांच्या टेरिफ बॉम्बमुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुखावले आहेत. दोघांमधील मैत्रीचे संबंध ताणले गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यातच ट्रम्प यांनी मोदींचा एक फोटो सोशल मीडियात पोस्ट करत आपल्या मनातील खदखद बाहेर काढली आहे.
टेरिफवरून सुरू असलेल्या वादात ट्रम्प यांनी मोठं विधान केले आहे. आपण चीनमुळे भारत आणि रशियाला गमावले असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांची साथ समृध्द व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियातील या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींसह रशियाचे राष्ट्रपती क्वादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांचा एकत्रित फोटोही शेअर केला आहे.
ट्रम्प यांच्या या पोस्टमध्ये चर्चांना उधाण आले आहे. मोदी, पुतीन आणि जिनिपिंग यांची नुकतीच एससीओ शिखर संमेलनात एकत्रित भेट झाली होती. त्याचे फोटोही सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. तिन्ही नेत्यांनी या एकत्रित येण्याने डोनाल्ड ट्रम्प यांना हादरा बसल्याचे मानले जात आहे. तिघांच्या या भेटीने अमेरिकेसमोर नवे आव्हान उभे ठाकल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यापार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी केलेल्या पोस्टला महत्व प्राप्त झाले आहे. मागील महिन्यात ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टेरिफ लावला आहे. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. रशियाकडून तेल खरेदी करू नये, यासाठी दबाव म्हणून टेरिफ लावल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. मात्र, भारताने अमेरिकेचा हा दबाव जुगारत पुतीन आणि जिनिपिंग यांना जवळ केल्याने ट्रम्प यांना धक्का बसला आहे.
ट्रम्प यांनी चीनवर तब्बल 145 टक्के टेरिफ लादला होता. पण चीननेही ट्रम्प यांच्यासमोर न झुकता जशास तसे उत्तर दिले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी हा निर्णय 90 दिवसांसाठी पुढे ढकलला. त्यांनी चीनला जवळ करण्याचा प्रयत्न केला होता. पण आता भारतानेही चीनसोबतचे संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी पावले उचलली आहेत.
पंतप्रधान मोदी नुकतेच चीनला गेले होते. तब्बल सात वर्षांनंतर त्यांनी चीनमध्ये पाऊल ठेवले होते. मोदींचे अत्यंत उत्साहात स्वागतही करण्यात आले. जिनपिंग आणि मोदींमध्ये सीमा वादासह व्यापार संबंध सुधारण्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. ड्रॅगन आणि हत्ती सोबत येणे गरजेचे असल्याचे विधान करत जिनपिंग यांनी जागतिक पातळीवर एक सुचक संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ट्रम्प हादरले असून भारतापासून अधिक दूर जाण्याची भीती त्यांना वाटू लागल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.