NCP Hearing : शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदा; सुनावणीत अजितदादा गटाचा दावा

Election Commission Hearing News : अजित पवार गटाकडून युक्तिवाद करताना वकिलांनी शरद पवार गटावर अनेक आक्षेप घेतले आहेत.
Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP Hearing : शरद पवार हे मर्जीनुसार पक्ष चालवतात. पक्षाच्या घटनेचे पालन व्यवस्थित होत नाही. केवळ एका पत्राद्वारे नियुक्त्या होतात. तसेच, जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी झालेली नियुक्तीही बेकायदेशीर आहे, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या वकिलांनी केला आहे. (Sharad Pawar runs party at will, Jayant Patil's appointment illegal : Ajit Pawar group )

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. शरद पवार गटाकडून स्वतः पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार वंदना चव्हाण हे उपस्थित आहेत, तर अजित पवार गटाकडून कोणीही उपस्थित नाहीत. त्यांच्या गटाकडून वकील महेश जेठमलानी, नीरज किशन कौल, मनिंदरसिंग हे युक्तिवाद करत आहेत.

Ajit Pawar-Sharad Pawar
BJP Union Ministers Statement : राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने केला मोठा दावा...

अजित पवार गटाकडून युक्तिवाद करताना वकिलांनी शरद पवार गटावर अनेक आक्षेप घेतले आहेत. शरद पवार हे मर्जीनुसार पक्ष चालवतात. पक्षाच्या घटनेचे पालन व्यवस्थित होत नाही. केवळ एका पत्राद्वारे नियुक्त्या होतात. याशिवाय जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे. कारण त्यांची निवड राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या आधीच करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होण्याआधीच त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आमदारांची संख्या महत्त्वाची आहे. आमच्या बाजूने महाराष्ट्र विधानसभेतील ५४ पैकी ४२ आमदार आहेत. तसेच, विधान परिषदेत नऊपैकी सहा आमदार आमच्या सोबत आहेत. महाराष्ट्र आणि नागालॅंडमधील आमदार आमच्याच बाजूने आहेत. लोकसभा आणि राज्यसभेतील प्रत्येकी एक खासदार आमच्या बाजूने आहेत, असा दावाही अजित पवार गटाने केला आहे.

Ajit Pawar-Sharad Pawar
NCP Hearing : राष्ट्रवादीत हालचाली वाढल्या; निवडणूक आयोगाच्या सुनावणीला शरद पवार उपस्थित राहणार

पक्षाचे मुख्य प्रतोद हे आमच्या बाजूने आहेत, त्यामुळे नऊ आमदारांवर कारवाई करा, हे शरद पवार गटाचे पत्र बेकायदेशीर आहे, असाही दावा अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे.

दरम्यान, सप्टेंबर २०२२ मध्ये शरद पवार यांची फेरनिवड झाली, ती सर्व नियमांचे पालन करून झाली होती. ९० डेलिगेटनी अनुमोदन दिलं हेाते, त्या सर्वांच्या त्यावर सह्या आहेत. आता जे पक्षावर दावा करत आहेत, त्यांनीसुद्धा अध्यक्षपदासाठी संमती दिली होती, असे स्पष्टीकरण शरद पवार गटाकडून पवारांच्या कार्यशैलीवर घेण्यात आलेल्या आक्षेपानंतर देण्यात आले. दरम्यान, त्यावर अजित पवार गटाकडूनही प्रतियुक्तिवाद करण्यात आला. मुळात पक्षाच्या या नियुक्त्या योग्य पद्धतीने झाल्या होत्या का, हे पाहिले पाहिजे.

Ajit Pawar-Sharad Pawar
Rashmi Shukla New DGP? : रश्मी शुक्लांविरोधात शिवसेना आक्रमक; पोलिस महासंचालक झाल्यास कोर्टात जाण्याचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com