ED Raid : मंत्र्याच्या घरी ईडीच्या छापा, तब्बल 20 गाड्या घेऊन अधिकारी पोहोचले अन्...

Sanjeev Arora AAP : ईडीने आज सकाळी पंजाबचे कॅबिनेट मंत्री संजीव अरोडा यांच्या घरावर छापा मारला. मागील वर्षभरातील अरोडा यांच्या विरोधात ईडीची ही तिसरी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.
Punjab minister Sanjeev Arora’s residence during the Enforcement Directorate raid operation.
Punjab minister Sanjeev Arora’s residence during the Enforcement Directorate raid operation.sarkarnama
Published on
Updated on

ED Raid News : पंजाबचे कॅबिनेट मंत्री संजीव अरोडा यांच्या घरी ईडीने छापा मारला आहे. सकाळी साडेसात वाजता 20 गाड्यांमधून पोहोचले. अरोडा यांच्या चंदीगढ स्थित सेक्टर 2 मधील निवास्थानी छापेमारी केली.

सुरक्षेसाठी तब्बल 24 CIA आणि SF जवान तैनात करण्यात आले होते. दरम्यान, या छापेमारीनंतर आम आदमी पक्षाचे खासदार यांनी भाजपची सुपारी किलर ईडी आज परत पंजाबमध्ये पोहोचली आहे, अशी टीका केली आहे.

संजय सिंह म्हणाले, हा तमाशा दोन तीन दिवस चालले. खोट्या बातम्या पेरल्या जातील. त्यानंतर सुपारी किलर परत जातील. आणि त्यांचे मालक त्यांन नवीन टास्क देतील. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सरकाराला बदनाम करण्यासाठी हे सगळे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

या छापेमारीनंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, आज पुन्हा भाजची ईडी संजीव अरोडा यांच्या घरी आली होती. एका वर्षात हे तिसऱ्यांदा आहे की भाजपची ईडी त्यांच्या घरी आली आहे. मात्र तरी देखील त्यांना काही मिळाले नाही.

Punjab minister Sanjeev Arora’s residence during the Enforcement Directorate raid operation.
West Bengal News : बंगालमध्ये मुख्य सचिवांच्या आदेशानंतर आता ‘ईडी’ची मोठी कारवाई; पोलीस उपायुक्तांभोवती फास आवळला...

भगवंत म्हटले की, मला मोदींना सांगायचे आहे की, पंजाब ही संतांची, गुरुंची भूमी आहे. औरंगजेब देख हिला नमवू शकला नाही. ही भगत सिंहांची भूमी आहे. त्यांनी इंग्रजांच्या विरोधात नतमस्क झाले नाहीत. पंजाब मोदीच्या समोर झुकणार नाही. आम्ही पंजाब, ईडी और भाजप या अनैतिक आघाडीला नष्ट करू

संजीव आरोडांवर काय आरोप?

संजीव अरोडा यांच्यावर मनी लाँड्रींगचा आरोप आहे. त्यांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून 100 कोटीहून अधिक रुपयांच्या मोबाईल फोनची खोटी खरेदी, खोटा जीएसटी तसेच त्याला दुबईमधून भारतात आणण्याचा राउंड ट्रिप निर्यात दाखवली आहे. या प्रकरणाचा तपास ईडीकडून केला जात आहे. तसेच कंपनीच्या माध्यमातून मनी लाँड्रींग करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

Punjab minister Sanjeev Arora’s residence during the Enforcement Directorate raid operation.
ED raid : ममता बॅनर्जींंना सत्तेत पोहचवणाऱ्या 'पडद्यामागच्या' कलाकारालाच उचललं : मतदानापूर्वीच पश्चिम बंगालमध्ये 'ईडी'ची मोठी कारवाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com