Liquor policy scam case : सक्तवसुली संचालनालयाने कथित मद्य घोटाळ्याच्या चौकशीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. केजरीवाल यांना आज चौकशीला सामोरे जावे लागणार होते. मात्र, त्यांनी चौकशीला दांडी मारत थेट पंजाब गाठले आहे. ईडीच्या नोटिशीला उत्तर पाठवून केजरीवाल विपश्यनेसाठी गेले आहेत.
कथित मद्य घोटाळ्यात (Liquor policy Scam) 'आप'चे दोन बडे नेते सध्या तुरुंगात आहेत. या प्रकरणी केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनाही आतापर्यंत ईडीने (ED) दोनदा चौकशीसाठी बोलावले होते. पण केजरीवाल यांनी जाणे टाळले आहे. गुरुवारी त्यांनी ईडीच्या नोटिशीला उत्तर देताना ही नोटीस राजकीय (Politics) हेतूने प्रेरित आणि चुकीची असल्याचे म्हटले आहे. माझ्याकडे लपवण्यासारखे काहीच नाही, असेही केजरीवाल म्हणाले.
मी प्रत्येक कायदेशीर नोटीस मानायला तयार असल्याचे सांगत केजरीवाल यांनी म्हटले आहे की, ईडीची ही नोटीस आधीच्या नोटिशीप्रमाणेच बेकायदेशीर आहे. ती राजकीय हेतूने प्रेरित असल्याने परत घ्यावी. मी माझे संपूर्ण आयुष्य प्रामाणिक आणि पारदर्शकपणे जगलो आहे. माझ्याजवळ लपवण्यासारखे काहीच नाही. नोटिशीची वेळ पाहता ही लोकसभा निवडणुकीआधी खळबळ उडवणारी बातमी करण्यासाठी केलेले प्रयत्न वाटतात, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
मला 30 ऑक्टोबर रोजीही नोटीस पाठवण्यात आली होती. नोटीस येण्याआधीच भाजपच्या नेत्यांकडून मला नोटीस येईल आणि अटक होईल, अशी वक्तव्ये सुरू होती. त्यानंतर लगेच नोटीस आली. त्यामुळे ही नोटीस माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांना आधीच मिळाली होती, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केजरीवाल यांनी ईडी चौकशीला दांडी मारल्यानंतर भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडले. केजरीवाल आणि कर्तव्य एकत्रित काम करू शकत नाहीत, असे संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. केजरीवाल हे विपश्यनेच्या नावाखाली लपत आहेत. कुशासन आणि विपश्यना एकत्र प्रवास करू शकत नाहीत, अशी टीका पात्रा यांनी केली.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.