मोठी बातमी : ईडीची देशभरात १८ ठिकाणी छापेमारी ; IAS पूजा सिंघल यांचीही चौकशी

गौण खणिजमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली होती, त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई सुरु असल्याची माहिती आहे.
ED raid Latest Marathi News, IAS Pooja Singhal News, ED Raid on IAS Pooja Singhal
ED raid Latest Marathi News, IAS Pooja Singhal News, ED Raid on IAS Pooja Singhal Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : (ED raid) सक्तवसुली संचलनालयाने (ed)आज देशभरात छापेमारी केली आहे. झारखंड, हरियाना, राजस्थान,पश्चिम बंगाल, बिहारमध्ये १८ ठिकाणी शुक्रवारी सकाळी ईडीनं मोठी कारवाई केली आहे. एका महिला सनदी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावरही ईडीनं (Enforcement Directorate) छापा टाकल्यानं खळबळ उडाली आहे. (ED raid Latest Marathi News)

झारखंडची राजधानी रांची येथील पल्स हाँस्पिटल शिवाय पंचवटी रेसिडेंट, कांके रोड, चांदनी चौक, हरिओम टॅावर येथे ईडीने छापेमारी केली आहे. झारखंडच्या खनिज आणि भूवैज्ञानिक विभागाच्या सचिव पूजा सिंघल (Pooja Singhal) यांचीही चौकशी ईडी करत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

ED raid Latest Marathi News, IAS Pooja Singhal News, ED Raid on IAS Pooja Singhal
भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

रांचीच्या पल्‍स हॉस्‍पीटलमध्ये ईडीचं पथक पोहचलं आहे. येथे रुग्ण आणि हाँस्पिटल कर्मचारी सोडून अन्य कुणालाही प्रवेश दिला जात नसून परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. झारखंडसह देशात १८ ठिकाणी हे छापेमारी सत्र सुरु असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गौण खणिजमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली होती, त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई सुरु असल्याची माहिती आहे.

ED raid Latest Marathi News, IAS Pooja Singhal News, ED Raid on IAS Pooja Singhal
आमदारांच्या पगारात भरमसाठ वाढ ; आता दरमहा मिळणार नव्वद हजार रुपये

झा्रखंडचे कनिष्ठ अभियंत्रा राम विनोद प्रसाद सिन्हा यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाशी संबधीत असलेल्यांवर ईडीनं फास आवळाला सुरवात केली आहे. सिन्हा यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आपल्या पदाचा गैरउपयोग करुन १८ कोटी रुपयांच्या सरकारी संपत्तीत गैरव्यवहार झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पूजा सिंघल (IAS Pooja Singhal) आणि उद्योगपती अमित अग्रवाल यांच्या कार्यालयावर ईडीनं छापा टाकला आहे. पूजा सिंघल यांचे घर, कार्यालयावर केलेल्या ईडीच्या कारवाईचे फोटो समाजमाध्यमांवर शेअर झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com