आमदारांच्या पगारात भरमसाठ वाढ ; आता दरमहा मिळणार नव्वद हजार रुपये

अकरा वर्षानंतर होत असलेली ही वाढ समाधानकारक नाही, असे विधासभेच्या अध्यक्षांचे मत आहे.
Delhi Assembly
Delhi Assemblysarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीतील आमदारांच्या (delhi mla) पगारात (salaries) लवकरच वाढ होणार आहे. याबाबत केंद्र सरकारने (Central Government) मंजूरी दिली आहे. सध्या आमदारांना सर्व भत्त्यासह दरमहा ५४ हजार रुपये मिळत होते, यात वाढ झाल्यावर त्यांना ९० हजार रुपये मिळणार आहेत.

दिल्लीच्या आमदारांचा सध्या मुळ पगार हा १२ हजार रुपये आहे. यात वाढ होऊन तो आता २० हजार रुपये होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव दिल्ली सरकारने २०१५ मध्ये केंद्र सरकारकडे पाठविला होता. पण तेव्हा त्याला मंजूरी मिळाली नव्हती. सध्या मंजूर झालेल्या पगारवाढ खूप कमी असल्याचे मत दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी व्यक्त केली आहे.

Delhi Assembly
भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल म्हणाले,"गेल्यावेळी २०११ मध्ये आमदारांच्या पगारात वाढ झाली होती.त्यानंतर अकरा वर्षानंतर होत असलेली ही वाढ समाधानकारक नाही, अन्य राज्यातील आमदारांप्रमाणे दिल्लीच्या आमदारांचीही पगारवाढ व्हायला हवी," दिल्लीच्या आमदारांच्या पगारवाढीचे विधेयक येत्या अधिवेशनात मंजूर करण्यात येणार आहे.

Delhi Assembly
थेट राज ठाकरेंनाच आव्हान देणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह कोण आहेत?

दिल्ली सरकारने २०१५ मध्ये पगारवाढीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. पण हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला नव्हता. त्यावेळी केंद्र सरकारने राज्य सरकारला याबाबत काही प्रस्ताव पाठविले होते. त्यानंतर दिल्ली सरकारने २०२१ मध्ये तो प्रस्ताव मान्य केला होता. पुन्हा हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर या प्रस्तावाला केंद्रानं मंजुरी दिली.

१० राज्यात आमदारांना मिळणारे वेतन (दरमहा)

  1. उत्तराखंड :१.९८ लाख

  2. हिमाचल प्रदेश :१.९० लाख

  3. हरियाणा :१.५५ लाख

  4. बिहार :१.३० लाख

  5. राजस्थान : १.४२ लाख

  6. तेलंगणा :२.५० लाख

  7. आंध्रप्रदेश :१.२५ लाख

  8. गुजरात :१.५ लाख

  9. उत्तरप्रदेश :९५ हजार

  10. दिल्ली :९० हजार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com