ED team attacked : रेड टाकायला गेलेल्या ‘ईडी’च्या टीमवर हल्ला, गाडी फोडली; अधिकारी गेले पळून...

ED Raid : हल्ला करणारे तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे कार्यकर्ते असल्याचा दावा...
ED team attacked
ED team attackedSarkarnama
Published on
Updated on

West Bengal News : सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी म्हटलं, की सध्या देशभरातील राजकीय नेत्यांना धडकी भरते. मंत्री असो की आमदार, चौकशीसाठी बोलावून थेट अटक केली जाते. घरांवर रेड टाकली जाते. त्यामुळे प्रामुख्याने विरोधी पक्षाकडून ईडीच्या कारवायांवर सातत्याने टीका होते. अशीच एक रेड टाकत असताना ईडी अधिकाऱ्यांना एका नेत्याच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. अधिकाऱ्यांवर हल्ला करून त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्याची घटना घडली आहे.

पश्चिम बंगालमधील (West Bengal) 24 परगणा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. ईडीचे अधिकारी शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे (TMC) पदाधिकारी शाहजहान शेख आणि शंकर आध्य व नातेवाईकांच्या घरी रेड टाकण्यासाठी गेले होते. केंद्रीय सुरक्षा दलाचे जवानही त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात होते. रेशनिंग वितरण घोटाळ्याप्रकरणी ही रेड टाकण्यात आली.

ED team attacked
ED Notice Dalit Farmers : भाजप नेत्याला विरोध, दलित शेतकऱ्यांना ईडीची नोटीस!

ईडीचे (ED) अधिकारी शेख यांच्या घराबाहेर गेल्यानंतर त्यांनी आत प्रवेश करण्यासाठी अनेकदा दरवाजा वाजविला. त्यांना आवाज दिला. पण दरवाजा उघडला नाही. याचवेळी जवळपास शंभर जणांचा जमाव घराबाहेर आला. यामध्ये महिलांचाही समावेश होता. त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यातील काहींनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करून एका गाडीचे नुकसान केले. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, जमावाचा आक्रमक पवित्रा पाहून ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला. कुणीही जखमी झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेशनिंग घोटाळाप्रकरणी यापूर्वीच तृणमूलच्या एका माजी मंत्र्यांना अटक करण्यात आले आहे. ईडीकडून महिनाभरापासून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. आता हल्ल्याच्या घटनेनंतर हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजुमदार यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले, रेड टाकण्यात आलेल्या सर्वांवर भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ईडी त्यांच्यावर कारवाई करणार आहे. हा हल्ला म्हणजे राज्यात रोहिंग्यांकडून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली जात असल्याचे दिसते.

ED team attacked
Election Year 2024 : जगातील निवडणुका यंदा इतिहास घडवणार; भारतासह 65 देशांमध्ये वर्चस्वाची लढाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com