

Paper leak row linked to ministry fire claims: पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाला आग लागल्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. मात्र या प्रकरणाबाबत केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट भूमिका मांडत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आग लागलेली इमारत ही शिक्षण मंत्रालयाचे मुख्य कार्यालय नसून दिल्लीतील ITO परिसरात असलेल्या School of Planning and Architecture (SPA) या संस्थेच्या आवारातील इमारतीचा भाग आहे. शिक्षण मंत्रालयाचे कार्यालय कर्तव्य भवन-2, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, नवी दिल्ली येथे कार्यरत असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
आग लागल्याच्या घटनेनंतर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक दावे करण्यात आले. काहींनी या घटनेचा संबंध NEET पेपरफुटी आणि CBSE निकालांवरील वादांशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चुकीची माहिती पसरू नये आणि वस्तुस्थिती जनतेसमोर यावी यासाठी मंत्रालयाला अधिकृत स्पष्टीकरण जारी करावे लागले.
या घटनेवर विरोधी पक्षातील काही नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी या घटनेवर भाष्य करत सरकारवर टीका केली. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवरील प्रश्न उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनीही या घटनेबाबत प्रश्न उपस्थित केले आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 9.37 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तातडीने 8 अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. अग्निशमन दलाने काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून त्याबाबत चौकशी सुरू आहे.
एकूणच, शिक्षण मंत्रालयाच्या मुख्य कार्यालयाला आग लागल्याचा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले असून, ही घटना SPA परिसरातील एका इमारतीपुरती मर्यादित असल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.