MLC Election News : राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे मतदारसंघातून विधान परिषदेसाठी विक्रम काकडे यांना उमदेवारी जाहीर केली आहे. सुनील टिंगेर यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. मात्र, काकडे यांची उमेदवारी अंतिम असेल असे पक्षाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या माजी आमदार विलास लांडे यांनी काकडेंच्या उमेदवारीवर आपले मत व्यक्त केले आहे.
लांडे म्हणाले,'आमच्या पाठीमागे आता कोण आहे? किंवा कार्यकर्त्यांना ताकद देणार नेता कोण राहिला आहे? याबाबत कार्यकर्ते आता चर्चा करतात, भीती व्यक्त करतात. त्यामुळे कार्यकर्त्याला संजीवनी मिळावी, त्यामुळे आमच्यातला प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ताला उमेदवारी द्यावी, असे अनेक कार्यकर्त्यांना वाटत होते.'
पुढे बोलताना ते म्हणाले, 'सुनील घुले असो अथवा अनेक कार्यकर्ते आहेत त्यातल्या कोणाला दिली असतील तर पक्षाला बळकटी मिळाली असती, असं माझं मत आहे.'
काकडेंच्या उमेदवारीबाबत बोलातना ते म्हणाले, 'पक्षाच्या दृष्टिकोणातून त्यांचाकडे ताकद (आर्थिक) आहे असे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. ज्याला उमेदवारी दिली तो मोठा संघटक, ताकदीचा आहे. आर्थिकदृष्ट्या सुबकता त्याच्याकडे आहे, असे कार्यकर्त्यांमध्ये बोललं जातं आहे.'
'पक्षालासुद्धा त्या ठिकाणी असं माणसं हवी असतात जी पक्षाला ताकद देऊ शकतील. जनसंख्या गोळा करण्यासाठी देखील पक्षाला अशी लोकं असतात. आर्थिकदृष्ट्या सक्षमआहे म्हणून त्यांना मिळाली आहे, अशी काही कार्यकर्त्यांची भावना आहे.', असे देखील त्यांनी सांगितले.
अजितदादांची आठवण काढताना लांडे म्हणाले, अजितदादा असते तर त्यांनी प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी दिली असती. ते नसल्याने आम्ही आता पूर्ण हतब आहोत. दरम्यान, जनसंख्या आणण्यासाठी अशी लोकं पक्षाला लागतात. त्यांची पण पक्षाला गरज असते असे देखील ते काकडेंच्या उमेदवारी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.