दिल्ली : केंद्रीय कृषीमंत्री (Union Agriculture Minister) नरेंद्रसिंह तोमर यांनी आपल्या "कृषी कायदे पुन्हा आणू शकतो", या वक्तव्यावरुन यु-टर्न घेतला आहे. चहुबाजूंनी टीका होताच त्यांनी आपण असं म्हणालोच नव्हतो, असं म्हणत हात वर केले आहेत. नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी नागपुरमधील एका कार्यक्रमात बोलताना "मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा आणले आणले जाऊ शकतात" असे विधान केले होते, त्यावरुन बराच वाद सुरु झाला होता.
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवरील शेतकऱ्यांनी तब्बल एक वर्ष आंदोलन पुकारले होते. आंदोलनात ६०० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अचानक तीन कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. पण, त्यानंतर आता जरी हे कायदे मागे घेतले असले तरी "ते कायदे आम्ही परत आणू शकतो", असे कृषीमंत्री म्हणाले होते, त्यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
नेमकं काय म्हणाले होते कृषीमंत्री? -
आम्ही शेतीमधील बदालासाठी आधुनिक पाऊल म्हणून कृषी कायदे आणले. पण काही लोकांना हे कायदे आवडले नाहीत. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही मोठी सुधारणा केली होती. पण, आम्ही ते कायदे मागे घेतले. आम्ही एक पाऊल मागे आलो आहोत. मात्र, आम्ही पुन्हा पुढे जाऊ शकतो. कारण शेतकरी हा भारताचा कणा आहे. असे म्हणतं त्यांनी सरकार हे कृषी कायदे पुन्हा लागू करू शकते असे संकेत दिले होते.
कृषी मंत्र्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका होवू लागली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हंटले होते की, कृषीमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या माफीचा अपमान केला आहे, आणि हि अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. जर पुन्हा शेती विरोधी पावलं पडली तर अन्नदाता पुन्हा सत्याग्रह करेल. याआधी देखील अहंकाराला हरवले होते, पुन्हा हरवू असे म्हणत कृषी मंत्र्यांना उत्तर दिले होते.
"कृषीमंत्र्यांचा यु-टर्न"
भारत सरकारने चांगले कायदे बनवले होते. पण, काही अपरिहार्य कारणांमुळे आम्ही कायदे मागे घेतले. भारत सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करत आहे. मी कृषी कायदे पुन्हा आणू असं कधीच म्हटलं नव्हत, माझे वक्तव्य चुकीच्या अर्थाने समोर आणले गेले, असे सांगत कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आपल्या वक्तव्यावरून यूटर्न घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.