Mahayuti Politics : फडणवीसांच्या आदेशाला शिंदेंच्या मंत्र्यांचा विरोध; तुषार दोशींच्या बदलीवरून मोठी मागणी

Devendra Fadnavis Vs Deepak Kesarkar : अंतरवाली सराटी लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी सुरू
Eknath Shinde, Tushar Doshi, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Tushar Doshi, Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : मराठा आरक्षणासाठी बसलेल्या अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार झाला, त्यावेळी जालन्याचे पोलिस अधीक्षक असलेले तुषार दोशी यांची बदली करण्यात आली आहे. पदोन्नती देत दोषींना गुन्हे विभाग अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या या आदेशाला आता सत्ताधारी शिवसेनेचे नेते मंत्री दीपक केसरकर यांनी विरोध केला आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीतील राजकारण तापण्याच शक्यता आहे. (Latest Political News)

दीपक केसरकर यांनी तुषार दोषी यांच्या बदलीच्या आदेशास स्थगिती देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी शिंदेंना निवदेन दिले आहे. यात केसरकर म्हणाले, 'जालन्याचे पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांची गृहविभागाच्या आदेशानुसार गुन्हे अन्वेषण विभाग पुणेच्या अधिक्षकपदी बदली झाली आहे. मात्र त्यांच्यावर मराठा अंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे दोषारोप आहेत. या प्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत दोशींच्या बदली आदेशास स्थगिती द्यावी,' अशी विनंती केसरकर यांनी शिंदेंना केली आहे.

Eknath Shinde, Tushar Doshi, Devendra Fadnavis
Pimpri IT Raid : पिंपरीत 'ईडी'नंतर आता 'इन्कम टॅक्स'ची रेड; बिल्डरांच्या कार्यालय, घरांवर छापे !

दरम्यान, अंतरवाली सराटी येथील लाठीमाराच्या घटनेमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले होते. यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवरही धरले होते. यातून निर्माण झालेल्या दबावामुळे सरकारने तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. दोशी यांच्यावर कारवाई करण्याती मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केलेली आहे. मात्र दोशी यांना पदोन्नती देत त्यांची गुन्हे विभाग अधीक्षक म्हणून वर्णी लागली आहे. यामुळे पुन्हा एकदा वाद उदभवण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

असा आहे तुषार दोशींचा प्रवास

२००१ मध्ये नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तुषार दोशींची पहिली पोस्टिंग चंद्रपूरमध्ये करण्यात आली. राजुरा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. चंद्रपूरमधील राजुरा हा नक्षलींचा प्रभाव असलेला भाग होता. यानंतर लातूर शहर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई या शहरांमध्ये त्यांनी काम केले आहे. तुषार दोशी हे पुणे पोलिस दलात सायबर विभागात उपायुक्त होते. २०१८ च्या सुमारास नवी मुंबईतील पोलिस उपायुक्तपदी कार्यरत असताना तुषार दोशी एजाज खान अटक प्रकरण, अश्विनी बिद्रे-गोरे हत्या प्रकरणामुळे चर्चेत होते.

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde, Tushar Doshi, Devendra Fadnavis
MP Sujay Vikhe : खासदार विखेंनी विरोधकांकडे मागितला गेल्या तीस वर्षांचा हिशोब; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com