Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीबाबत मोठी अपडेट! आयोगानं कंबर कसली...

Election Commission of India Assembly Elections 2024 Maharashtra : महायुतीच्या सरकारची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्याआधीच नव्या सरकारचा शपथविधी होणे आवश्यक आहे.
Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता महाराष्ट्रासह देशातील चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.

महाराष्ट्रातील विद्यमान सरकारची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपुष्टात येणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याआधीच निवडणुका घेऊन नवे सरकार अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.

महाराष्ट्रासह देशात हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभेची निवडणूक होणार आहे. हरियाणा सरकारची मुदत 3 नोव्हेंबर तर झारखंड सरकारची मुदत 5 जानेवारी 2025 रोजी संपुष्टात येणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे.

Maharashtra Assembly Election
Chandrababu Naidu Vs Jagan Mohan Reddy : ‘फर्निचर चोर’वरून चंद्राबाबू अन् जगनमोहन यांच्यात ‘वॉर’

निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये 1 जुलै 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली असून त्याआधी पात्र असलेल्यांना नोंदणी करता येणार आहे.

Maharashtra Assembly Election
Arvind Kejriwal : केजरीवालांना तुरुंगातच राहावं लागणार? ED नं उचललं मोठं पाऊल

मतदारयाद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया 25 जूनपासून सुरू केली जाणार आहे. तर 20 ऑगस्टला अंतिम मतदारयाद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत. तसेच मतदान केंद्र निश्चित करण्याची कारवाईही या कालावधीत होणार आहे. त्यानंतर आयोगाकडून निवडणुकीच्या तयारी आढावा घेतला जाईल आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com