Election Commission News : भाजपने तयार केलेला ‘तो’ व्हिडिओ आक्षेपार्ह; निवडणूक आयोगाचे ‘एक्स’ला आदेश

BJP Politics : कर्नाटक भाजपचे अध्यक्ष आणि सोशल मीडिया समन्वयकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
Election Commission to X
Election Commission to XSarkarnama

New Delhi News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामैया यांचा एक व्हिडिओ कर्नाटक भाजपने तयार केला आहे. हा व्हिडिओ कर्नाटक भाजपच्या ‘एक्स’ हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. काँग्रेसने याबाबत निवडणूक आयोगाकडे (Election Commission News) तक्रार केली होती. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आता आयोगाने हा व्हिडिओ हटवण्याचे आदेश ‘एक्स’ला दिले आहेत.

निवडणूक आयोगाने मंगळवारी ‘एक्स’च्या अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. काही दिवसांपुर्वी कर्नाटक भाजपने (BJP) हा व्हिडिओ पोस्ट केला होता. काँग्रेसच्या नेत्यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित व्हिडिओ हटवण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी भाजपला दिले होते. याबाबत प्रदेश अध्यक्षांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. (Latest Political News)

Election Commission to X
Arvind Kejriwal News : ...त्यांनी खूप चलाखी केली! सुप्रीम कोर्टात केजरीवालांच्या जामिनाला 'ईडी'चा कडाडून विरोध

निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर भाजपने व्हिडिओ न हटवल्याने आता निवडणूक आयोगानेच आदेश काढले आहेत. या आदेशामुळे ‘एक्स’ला ही पोस्ट हटवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. हा व्हिडिओ मुस्लिम आरक्षणाबाबत (Muslim Reservation) आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय आहे व्हिडिओमध्ये?

व्हिडिओमध्ये सुरूवातीला एका घरट्यामध्ये तीन अंडी दाखवण्यात आली होती. त्यावर एससी, एसटी आणि ओबीसी लिहिले आहे. त्यानंतर या घरट्यात राहुल गांधी व सिध्दरामैया हे मुस्लिम लिहिलेले अंडे ठेवले जाते. त्यातून पक्षी बाहेर आल्यानंतर राहुल आणि सिध्दरामैया हे दोघे मुस्लिम लिहिलेल्या पक्षाला अधिक खाऊ (आरक्षण) घालतात. या व्हिडिओवर काँग्रेसने (Congress) आक्षेप घेतला होता.

Election Commission to X
Lok Sabha Election Voting Update : तिसऱ्या टप्प्यात अमित शाहांसह 'या' दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com