गर्दी राजकीय पक्षाची अन् आयोगाचा पोलीस अधिकाऱ्याला दणका; तातडीनं केलं निलंबित

उत्तर प्रदेशातील निवडणुकीचे वातावरण तापलं असून समाजवादी पक्ष व भाजप अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.
Samajwadi Party Rally
Samajwadi Party RallySarkarnama
Published on
Updated on

लखनौ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) तोंडावर भाजपच्या तीन मंत्र्यांसह सात आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यापैकी काही आमदारांनी काल (ता.14) समाजवादी पक्षात प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या उपस्थितीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पण आता हे स्वागतच वादात अडकले असून पोलिसांनी तब्बल अडीच हजार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. असे असले तरी निवडणूक आयोगाने या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना दणका दिला आहे.

निवडणूक आयोगाने (Election Commission) 15 जानेवारीपर्यंत सभा न घेण्याच्या सूचना केल्या आहेत. काल झालेल्या कार्यक्रमाच्या गर्दीवरून निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. आयोगाला या प्रकरणी लखनौच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल मिळाला आहे. यानुसार राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त अजयकुमार शुक्ला यांनी स्टेशन हाऊस ऑफिसर दिनेशसिंह यांना निलंबित केले आहे. गौतमपल्ली पोलीस ठाण्याचे ते प्रमुख आहेत. समाजवादी पक्षाच्या कार्यक्रमात आचारसंहितेचा भंग झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दिनेशसिंह यांनी कर्तव्यात कसूर आणि दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांचे निलंबन तातडीने लागू करण्यात आले आहे.

Samajwadi Party Rally
मोठी बातमी : सरसेनाध्यक्ष रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचं नेमकं कारण आलं समोर

भाजपला (BJP) धक्के देत समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) मोठी आघाडी घेतली आहे. पण काल कार्यालयासमोर झालेला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम वादात अडकला आहे. समाजवादी पक्षाकडून या कार्यक्रमाला व्हर्चुअल सभा असे नाव दिले होते. पण प्रत्यक्षात या कार्यक्रमाला हजारो कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. त्यामध्ये कोरोनाच्या (Covid19) नियमांचे पालनही करण्यात आले नाही. त्यावरून वाद निर्माण झाला आहे.

Samajwadi Party Rally
कारमध्ये आता 6 एअरबॅग बंधनकारक; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मोठा निर्णय

दरम्यान, शुक्रवारी माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya), धरमसिंह सैनी यांच्यासह पाच आमदारांनी समाजवादी पक्षात अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. मागील चार दिवसांत या नेत्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. आणखी काही मंत्री व आमदार भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे. दिल्लीत मागील दोन उमेदवारांच्या नावांवर बैठकांचे सत्र सुरू असताना राज्यात नेते पक्ष सोडून जात होते. सर्वांनीच अखिलेश यांचा हात धरल्याने भाजपला धक्का बसला आहे. कारण या निवडणुकीत भाजप व समाजवादी पक्षातच थेट लढत होणार असल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com