Election Comission : महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर झालेले आरोप आयोगाच्या जिव्हारी; तब्बल 21 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय

Rahul Gandhi’s Repeated Allegations on Voter List Errors : बिहारमधील वर्षअखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी आयोगाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
Election Commission
Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

Impact on Upcoming Bihar Elections : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरून केंद्रीय निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीआधी मतदारयादीत अनेक बोगस मतदार नोंदणी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. संसदेसह देशभरात ते हा मुद्दा उचलून धरत आहेत. आयोगाने हा दावा फेटाळून लावला आहे. पण आता आयोगाने मतदारयाद्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

बिहारमधील वर्षअखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी आयोगाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. ही निवडणूक पारदर्शक आण वादविरहित पार पाडण्यासाठी आयोगाने कंबर कसली आहे. मतदारयादीतील घोळ टाळण्यासाठी आयोगाकडून घराघरी जाऊन मतदारयादीची पडताळणी केली जाणार असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

मतदार नोंदणी किंवा मतदारांची नावे वगळण्याबाबत सर्व नियमांचे पालन केले जाते. त्यानंतरही गंभीर आरोप केले जातात, असे आयोगाचे म्हणणे आहे. भाजपची मदत केल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जातो. प्रामुख्याने महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर सर्वच विरोधी पक्षांनी असा आरोप केला होता. या निवडणुकीनंतर बिहारमध्ये पहिली निवडणूक होणार आहे.

Election Commission
Pahalgam Attack : पहलगाम हल्ला नेमका कुणी केला? आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्विस्ट, धक्कादायक माहिती समोर

बिहारमध्ये मतदारयादीत कोणतेही घोळ राहू नयेत, यासाठी आयोग आता घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहे. मतदारयादीत कोणतीही चूक राहू नये आणि सर्व प्रक्रिया पारदर्शक व्हावी, हा त्यामागचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आयोगाकडून हे पाऊल टाकले जाणार आहे.

Election Commission
Pahalgam Attack : पहलगाम हल्ला नेमका कुणी केला? आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्विस्ट, धक्कादायक माहिती समोर

21 वर्षांनंतर पहिल्यांदाच

आयोगाकडून अशाप्रकारे घरोघरी जाऊन मतदारयाद्यांची पडताळणी 2004 मधील लोकसभा निवडणुकीआधी केली होती. त्यानंतर तब्बल 21 वर्षानंतर बिहार निवडणुकीआधी आयोग ही योजना राबविणार आहे. मागील काही वर्षांतील आयोगावरील आरोप खोडून काढण्यासाठी ही योजना आखण्यात आल्याची चर्चा आहे. त्यात आता आयोगाला कितपत यश मिळणार, राजकीय पक्षांकडून त्यावर काय प्रतिक्रिया उमटणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com