Election Commmission : आयोगाची ‘हिट’ विकेट’; 2029 च्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा

Lok Sabha Election 2024 Rajiv Kumar Announcement : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल तर अखेरच्या टप्प्याचे मतदान एक जूनला झाले. या काळात अनेक भागात उन्हाच्या झळांनी हैराण केले होते.
Lok Sabha Election 2029
Lok Sabha Election 2029Sarkarnama

Rajiv Kumar on 2029 Election : लोकसभा निवडणुकीचा तब्बल अडीच महिन्यांचा कार्यक्रम मंगळवारी (ता. 4) आटोपणार आहे. पण मतमोजणीआधीच आयोगाने 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. ही निवडणूक कधी होणार, याचे संकेत आयोगाने आताच दिले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरात सात टप्प्यांमध्ये घेतलेल्या मतदानावरून विरोधकांकडून बरीच टीका करण्यात आली. त्यातच निवडणूक कालावधीत आलेल्या उष्णतेच्या लाटेने मतदानावर विपरीत परिणाम झाला. अनेक मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली.

आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर महिनाभराने म्हणजे 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील तर अडीच महिन्यांनी म्हणजे 1 जूनला अखेरच्या टप्प्यातील मतदान झाले. या काळात निवडणूक कर्मचारी, अधिकाऱ्यांना उष्णतेचा त्रास सहन न झाल्याने काहींचा मृत्यू झाला. तर काहींना रुग्णालयात दाखल करावे लागले. उन्हाच्या झळांनी मतदारांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही चांगलाच घाम गाळावा लागला. यातून निवडणूक आयोगाने धडा घेतला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सोमवारी (ता. ३) घेतलेल्या पत्रकार परिषदेत 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेमुळे मतदान कमी झाल्याचे मान्य करत राजीव कुमार यांनी 2029 मध्ये एप्रिलअखेरपर्यंत लोकसभेची निवडणूक संपेल, असे स्पष्ट केले.

Lok Sabha Election 2029
Lok Sabha Election 2024 Results : मतदारांनी केला विश्वविक्रम; निवडणूक आयुक्तांकडून स्टँडिंग ‘ओव्हेशन’

लापता जंटलमेन

आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोग गायब होता. तसेच सोशल मीडियात ‘लापता जंटलमेन’ असे मीम्स व्हायरल झाले होते. त्यावरही राजीव कुमार यांनी भाष्य केले. आम्ही इथेच होतो, कधीच गायब झालो नाही. आता ‘लापता जंटलमेन परत आले’ मीम्समध्ये म्हणू शकता, असा टोला त्यांनी लगावला.

विश्वविक्रम

, निवडणूक पार पाडणं हा चमत्कार होता. तब्बल 64 कोटींहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हा विश्वविक्रम आहे. जगात आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठेही, कधीही मतदान झालेले नाही, असे सांगत निवडणूक आयुक्तांनी मतदारांना उभे राहून सलाम केला. महिला मतदारांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. तब्बल 31.4 कोटी महिलांनी मतदान केल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

Lok Sabha Election 2029
Lok Sabha Exit Poll 2024 : अंदाज ठरणार फेल, मुस्लिम मतांची साथ कोणाला? एक्झिट पोलमध्ये काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com