Lok Sabha Exit Poll 2024 : अंदाज ठरणार फेल, मुस्लिम मतांची साथ कोणाला? एक्झिट पोलमध्ये काय?

Muslims Votes On NDA Or India Alliance : मुस्लिम समाज काँग्रेसच्या मागे उभा राहिल्याचे एक्झिट पोलमधून दिसून येत आहे.
Lok Sabha Exit poll 2024
Lok Sabha Exit poll 2024 Sarkarnama

Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार हा इंडिया आणि एनडीए आघाडीच्या केंद्रस्थानी होता. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यावरून काँग्रेसला नरेंद्र मोदींनी टार्गेट केले.

मुस्लिम समाजाचे एनडीएला 2019 मध्ये 9 टक्के मतदान झालो होते. त्यामुळे यंदा त्यांचे मत किती घटणार आणि इंडिया आघाडीचे किती वाढणार याची उत्सुकता होती. एक्सिट पोलमध्ये त्या आकडेवारीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

इंडिया टुडे एक्सिस माय इंडिया एग्जिट पोलच्या आकड्यांनुसार एनडीएचे मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणात घटत आहेत तर, इंडिया आघाडीचे मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणात वाढतच आहेत. काँग्रेस Congress आघाडीला 2019 52 टक्के मतं होती ती तब्बल 24 टक्क्यांनी वाढत 76 टक्क्यांपर्यंत जाऊ शकता, असा अंदाज आहे.

एनडीएच्या मुस्लिम मतांमध्ये घट होत असून सहा टक्के मतं एनडीएला NDA मिळत आहे. त्यातही यामध्ये भाजपपेक्षा त्यांच्या मित्रपक्षांचा वाटा यामध्ये सर्वाधिक आहे. मुस्लिम मतं घटत असतानाही एनडीए सरकार स्थापन होण्याचा अंदाज पोलमध्ये वर्तवला आहे.

राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रा, भारत जोडो न्याय यात्रा यानंतर काँग्रेसला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. मुस्लिम समाज देखील काँग्रेसच्या मागे उभा राहिल्याचे एक्झिट पोलमधून दिसून येत आहे.

Lok Sabha Exit poll 2024
Devendra Fadnavis : लोकसभेची 'एक्झाम' फडणवीसांना 'डिस्टिंक्शन' मिळणार ?

बसपला फटका

उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम मते काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणात वळल्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे. या अंदाजानुसार इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशात मागील वेळी पेक्षा या वेळी 38 टक्के जास्त मुस्लिम मते मिळत आहेत. तर, बसपची तब्बल 34 टक्के मुस्लिम मते कमी होताना दिसत आहेत.

ममतांनाही फटका

एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपला 26 ते 28 जागा मिळणार मिळण्याचा अंदाज आहे. या अंदाजानुसार ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची 2 टक्के मुस्लिम मते कमी होत आहेत. एक टक्का मतं एनडीएचे तर एक टक्का मत इंडिया आघाडीचे वाढताना पश्चिम बंगालमध्ये दिसत आहे.

Lok Sabha Exit poll 2024
Lok Sabha Election 2024 : फडणवीसांची फोडाफोडी, शिंदेंची पळवापळवी, दादांची सरशी अन् साहेबांची बाजी! ; फैसला 20 तासांनी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com