Electoral Bond Fraud : भाजपला देणगी देणाऱ्या माजी न्यायाधीशांना अडीच कोटींना गंडवले...

Ex-judge cheated 2.5 crores : भाजपसाठी निवडणूक रोखे खरेदी करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले. मात्र, रोखे खरेदी न करता त्यांची फसवणूक करण्यात आली. डीएसआर वर्मा असे निवृत्त न्यायाधीशांचे नाव आहे.
Electoral Bond
Electoral BondSarkarnama
Published on
Updated on

Hyderabad News : एका निवृत्त न्यायाधीशांना भाजपला देणगी देणे चांगलेच अंगलट आले आहे. यामध्ये दोघांनी तब्बल अडीच कोटी रुपयांना गंडा घातला असून, या प्रकरणी त्यांनी हैदराबाद पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. भाजपसाठी निवडणूक रोखे खरेदी करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले. मात्र, रोखे खरेदी न करता त्यांची फसवणूक करण्यात आली. डीएसआर वर्मा असे निवृत्त न्यायाधीशांचे नाव आहे. इलेक्टोरल बॉन्डच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली असून, दोन भामट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलाहाबाद आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात (High Court) न्यायाधीश असणारे डीएसआर वर्मा हे 2010 मध्ये निवृत्त झाले. त्यांनी दि. 27 फेब्रुवारी रोजी हैदराबादमधील एका पोलिस ठाण्यात या फसवणूक प्रकरणी फौजदारी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या कुटुंबीयांकडून ही रक्कम दोन्ही आरोपींना भाजपचे (BJP) निवडणूक रोखे खरेदी करण्यासाठी देण्यात आली. परंतु त्यांनी कोणतेही बाँड खरेदी न करता त्यांची फसवणूक केली.

Electoral Bond
Lok Sabha Election 2024 : खासदार पाटील भाजपमध्ये; महाराष्ट्रात धडपडणाऱ्या केसीआर यांचा पक्ष होतोय रिकामा

डीएसआर वर्मा यांनी एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, आमच्या नातेवाइकांचे परिचित असलेले नरेंद्रन याने ओळखीचा फायदा घेत माझ्याकडे आले. त्यांनी केंद्रातील सत्ताधारी पक्षासाठी काही देणग्या मागितल्या. जे निवडणूक इलेक्टोरल बाँडद्वारे स्वीकारले जाणार होते. नरेंद्रन यांनी आमच्याकडून रक्कम गोळा करण्याची जबाबदारी सरथ रेड्डी यांच्यावर सोपवली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरथ रेड्डी यांनी त्यांना आणि त्यांच्या नातवंडांना अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी वचन दिले होते. निवृत्त न्यायाधीशांनी सांगितले की ते आणि त्याचे कुटुंब त्याच्या आमिषाला बळी पडले. त्यांची पत्नी आणि मुलीने या दोघांना भाजपचे निवडणूक रोखे खरेदी करण्यासाठी 2021मध्ये वेळोवेळी एकूण 2.5 कोटी रुपये दिले. व्हॉट्सॲपवर याबाबतचे संभाषण झाल्याचा पुरावादेखील त्यांच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

R

Electoral Bond
Shiv Sena : संजय गायकवाडांना महाराष्ट्राचा यूपी, बिहार करायचा आहे का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com