Lok Sabha Election 2024 : खासदार पाटील भाजपमध्ये; महाराष्ट्रात धडपडणाऱ्या केसीआर यांचा पक्ष होतोय रिकामा

K. Chandrashekar Rao News : मागील काही दिवसांत तीन विद्यमान खासदारांनी केसीआर यांना धक्का दिला आहे. दोन खासदारांनी भाजपमध्ये, तर एक खासदार काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.
MP BB Patil, K Chandrashekar Rao
MP BB Patil, K Chandrashekar RaoSarkarnama
Published on
Updated on

Hyderabad News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना मागील दोन दिवसांत दोन मोठे धक्के बसले आहेत. दोन विद्यमान खासदारांनी भारत राष्ट्र समितीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर काही दिवसांपूर्वीच एका विद्यमान खासदाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आतापर्यंत तीन खासदारांसह अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी बीआरएसला रामराम ठोकला आहे.

तेलंगणातील (Telangana) जहिराबाद मतदारसंघाचे खासदार बी. बी. पाटील (MP BB Patil) यांनी आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. दोनदा खासदार राहिलेले पाटील यांनी मागील निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) उमेदवार के. मदन मोहन राव यांचा सहा हजार मतांनी पराभव केला होता. काल नगरकुरनूल मतदारसंघाचे खासदार आणि दलित नेते पी. रामुलु यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.

MP BB Patil, K Chandrashekar Rao
Supreme Court News : आमदार-खासदारांच्या हातात मायक्रोचिप बसवायची का? सरन्यायाधीश चंद्रचूड भडकले

काही दिवसांपूर्वीच विद्यमान खासदार वेंकटेश नेता यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत केसीआरला (K Chandrashekar Rao) पहिला धक्का दिला होता. तेलंगणामध्ये लोकसभेच्या 17 जागा असून बीआरएसचे (BRS) नऊ खासदार निवडून आले होते. त्यापैकी तिघांनी पक्ष सोडला असून, आणखी काही खासदार बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका खासदाराने विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढवली होते. ते आता आमदार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नऊपैकी पाच विद्यमान खासदारांचे तिकीट केसीआर यांच्याकडून कापले जाणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर तिकीट न मिळण्याची भीती असलेल्या खासदारांकडून पक्ष सोडला जात आहे. त्यांच्यासोबत पक्षातील पदाधिकारी जाऊ लागले आहेत. सत्तांतर झाल्यापासून अनेक नेत्यांनी केसीआर यांची साथ सोडली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि बीआसएस अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.  

राज्यात काँग्रेसची सत्ता असल्याने वातावरणही बाजूने आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसला राज्यात केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. सर्वाधिक नऊ जागा बीआरएसला तरी चार जागा भाजप आणि एका जागेवर एमआयएमचा उमेदवार निवडून आला होता. काँग्रेसची सत्ता असल्याने निवडणुकीचे चित्र या वेळी बदलले असून, केसीआर यांच्या पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

R

MP BB Patil, K Chandrashekar Rao
Maharashtra Assembly News : जब्बारांनी रिल्स लाइफमधून जपलेली 'डिग्निटी' सत्ताधाऱ्यांनी रिअलमध्ये धुळीस मिळवली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com