Electoral Bond Scam : इलेक्टोरल बाँड जगातील सर्वात मोठा घोटाळा! अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीचा गंभीर आरोप

Parakala Prabhakar : केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असलेल्या 41 कंपन्यांनी इलेक्टोरल बाँड खरेदी करून भाजपला हजारो कोटींचा निधी दिला.
Parakala Prabhakar
Parakala PrabhakarSarkarnama
Published on
Updated on

BJP Political News : देशात सध्या इलेक्टोरल बाँडचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणी विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. यातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी सरकारला फटकारले आहे. आज बाहेर आलेले इलेक्टोरल बाँड हे कितीतरी पटीने अधिक मोठे आहे. हा भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच हे आता प्रत्येकाला समजू लागले आहे. त्यामुळे या घोटाळ्याची शिक्षा मतदार सरकारला देतील, असे स्पष्टक मतही प्रभाकर यांनी व्यक्त केले.

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना प्रभाकर यांनी मोदी सरकारवर टीका केली. या वेळी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या इलेक्टोरल बाँडच्या (Electoral Bond) आकडेवारीकडे लक्ष वेधले. त्यानुसार या घोटाळ्याचा प्रमुख लाभार्थी भाजप पक्ष आहे. या बाँडच्या माध्यमातून 12 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत भाजपला (BJP) सर्वाधिक सहा हजार 986 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यानंतर पश्चिम बंगालचा सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस (एक हजार 397 कोटी), काँग्रेस (एक हजार 334 कोटी) आणि भारत राष्ट्र समितीचा (एक हजार 322 कोटी) या पक्षांचा क्रमांक लागतो, असेही त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Parakala Prabhakar
Chetan Narake : तयारी कोल्हापूरची, पण पेपर हातकणंगलेचा; नरकेंनी नाकारला ठाकरेंचा प्रस्ताव

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारीतील एका निर्णयात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारला इलेक्टोरल बाँड स्किमवरून फटकारले होते. तसेच राजकीय पक्षांना निनावी निधीची परवानगी आणि इलेक्टोरल बाँड जारी करणे तत्काळ थांबवण्याचे आदेश स्टेट बँकेला दिले होते. केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीला सामोरे जात असलेल्या अनेक कंपन्यांनी या बाँडद्वारे भाजपला मोठा निधी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

Parakala Prabhakar
Rashmi Barve : रश्‍मी बर्वेंचे जात प्रमाणपत्र अवैध, तातडीने सुनावणी करण्यास हायकाेर्टाचा नकार, केदारांना आणखी एक धक्का !

काँग्रेसने (Congress) या प्रकरणी भाजपला झोडपून काढले आहे. इलेक्टोरल बाँडद्वारे भाजपने देशातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यानंतर अर्थमंत्री सीतारामन यांचे पती प्रभाकरन यांनीही भाजपची कोंडी केली. हा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे प्रभाकरन यांनी आरोप केला आहे. इलेक्टोरल बाँड घोटाळ्याची किंमत भाजपला लोकसभा निवडणुकीत चुकवावी लागेल, असेही भाकीत त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून फ्युचर गेमिंग कंपनीने भाजपला 60 कोटी, अरबिंदो फार्माने 5 कोटी रुपये दिले आहेत. या कंपन्यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती. ही चौकशी सुरू असतानाच संबंधित कंपन्यांनी भाजपला दिलेल्या निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे इलेक्टोरल बाँडला विरोधकांनी कायदेशीर भ्रष्टाचार म्हणून टीका केली.

(Edited by Sunil Dhumal)

R

Parakala Prabhakar
Dr.Bhagwat Karad News : मी उमेदवार असो की नसो.., खैरे-इम्तियाज पुन्हा निवडून येणार नाहीत : डॉ. कराडांचे भाकीत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com