Dr.Bhagwat Karad News : मी उमेदवार असो की नसो.., खैरे-इम्तियाज पुन्हा निवडून येणार नाहीत : डॉ. कराडांचे भाकीत

Eknath Shinde छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यात संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पहाटे दोनपासून मुंबईत तोडगा काढण्यासाठी बैठक सुरू होती.
Dr. Bhagwat Karad, Imtiaz Jaleel, Chandrakant Khaire
Dr. Bhagwat Karad, Imtiaz Jaleel, Chandrakant Khairesarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : संभाजीनगर लोकसभेची जागा भाजपने लढवावी ही सर्वसामान्य जनतेची आणि प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे. पाच वर्षांपासून आम्ही या मतदारसंघात मजबूत संघटनात्मक बांधणी केली आहे. बूथप्रमुख, पन्नाप्रमुख, शक्ती केंद्र आणि वाॅरिअर्सच्या माध्यमातून अकरा लाख मतदारांपर्यत आम्ही पोहाेचलो आहोत. त्यामुळे भाजप-महायुती ही जागा जिंकू शकते. उमेदवारी मला मिळो की न मिळो, पण चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील पुन्हा निवडून येणार नाहीत, असा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला.

छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील शिवसेना, भाजपत संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पहाटे दोनपासून मुंबईत तोडगा काढण्यासाठी बैठक सुरू होती. याआधीच्या चर्चा आणि बैठकांमधूनही मार्ग निघाला नाही. या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक असलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी `सरकारनामा`शी बोलताना आज संध्याकाळपर्यंत महायुतीचा संभाजीनगरातील उमेदवार ठरेल, असे सांगितले.

पक्षाने मला खूप काही दिले, राज्यसभेवर संधी दिली, त्यानंतर केंद्रात अर्थ राज्यमंत्री केले, त्यामुळे मी समाधानी आहे. पण, गेल्या पाच वर्षांत भाजपने या जिल्ह्यात ज्या प्रकारची संघटनात्मक बांधणी केली आहे, ती पाहता ही जागा आम्हालाच मिळाली पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. संभाजीनगर मतदारसंघात आम्ही सात ते आठ हजार कोटींची कामे केली आहेत.

Dr. Bhagwat Karad, Imtiaz Jaleel, Chandrakant Khaire
Dr. Bhagwat Karad News : संभाजीनगरची जागा भाजपनेच लढवावी ही तर जनतेची इच्छा..!

भविष्यात 25 हजार कोटींची कामे आम्हाला करायची आहेत. आमची तयारी पाहता संभाजीनगरची जागा भाजपला मिळेल असे वाटते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हीच भूमिका आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरची जागा शिवसेनेची आहे, ती आम्हालाच मिळाली पाहिजे, यावर ठाम आहेत. आतापर्यंत झालेल्या चर्चेत आणि बैठकांमध्ये कुठलाही तोडगा निघाला नाही.

राज्यातील ठाणे, सिंधुदुर्ग आणि संभाजीनगर या तीन लोकसभा मतदारसंघांतील तिढ्यामुळे महायुतीची यादी रखडली आहे. परंतु आज सायंकाळपर्यंत यावर अंतिम निर्णय होऊन महायुतीचे उमेदवार जाहीर होतील, असेही कराड यांनी स्पष्ट केले. संभाजीनगरची जागा आम्ही महायुती म्हणून एकत्रित लढणार आहोत. मला उमेदवारी मिळाली नाही, तरी शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही काम करू आणि जिंकू. कारण नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून अब की बार चारसाै पारचे उद्दिष्ट आम्हाला गाठायचे आहेच, असेही कराड यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खैरे, इम्तियाज जलील दोघेही निवडून येणार नाहीत...

शिवसेना ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण, ते आता पुन्हा निवडून येणार नाहीत, ते गेल्या निवडणुकीत पडले होते. शिवाय वीस वर्षे खासदार असताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काहीच केले नाही. त्यामुळे संभाजीनगरचे मतदार त्यांना स्वीकारणार नाहीत. हीच अवस्था एमआयएमच्या इम्तियाज जलील यांची आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी काय केले? असा सवालही कराड यांनी केला. खैरे आणि इम्तियाज जलील हे दोघेही पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, असा दावाही कराड यांनी केला.

Edited By : Umesh Bambare

R

Dr. Bhagwat Karad, Imtiaz Jaleel, Chandrakant Khaire
Imtiaz Jalil on Khaire News : चंद्रकांत खैरेंच्या उमेदवारीचे इम्तियाज जलील यांच्याकडून स्वागत, मात्र दिला 'हा' सल्ला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com