
US Presidential Election : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांच्यातील वादाने आता टोक गाठले आहे. मस्क यांनी त्यांचा महत्वाकांक्षी कायदा पारित केल्यानंतर मस्क यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. पूर्वी एकमेकांचे घनिष्ठ मित्र असलेल्या ट्रम्प आणि मस्क यांच्यात आता थेट राजकीय लढाई पाहायला मिळणार आहे.
मस्क यांनी सोशल मीडियातून अमेरिका पार्टी या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी एक्सवर याबाबत मतदानही घेतले होते. त्यावर त्यांना मोठी पसंती मिळाली होती. मस्क यांच्या म्हणण्यानुसार, हा पक्ष अमेरिकेतील द्विपक्षीय व्यवस्थेविरोधात एक पर्यायी व्यासपीठ असेल. सर्वसामान्य जनता म्हणजेच तुमच्या स्वातंत्र्यासाठी हा पक्ष बनविण्यात आला आहे.
नव्या राजकीय पक्षाची घोषणा करताच मस्क यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरूनही तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. आता 2028 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मस्क हे उमेदवार असणार की नाही, यावर चर्चा झडू लागल्या आहेत. एक्सवर एक यूझरने तुमचा मिडटर्म किंवा 2028 साठी काय प्लॅन आहे, असे मस्क यांना विचारले होते. त्यावर त्यांनी ‘पुढील वर्षी’ उत्तर दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
नव्या पक्षाचे प्रमुख कोण असणार, त्याची घटना, इतर नेते किंवा संबंधित कोणताही माहिती अद्याप अधिकृतपणे पुढे आलेली नाही. पण ट्रम्प यांच्याविरोधात हा पक्ष काम करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच मस्क यांना थेट दक्षिण आफ्रिकेत परत पाठविण्याबाबत सूचक विधान केल्याने खळबळ उडाली होती.
अमेरिकेच्या संविधानानुसार राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी एक महत्वाची अट आहे. अमेरिकेत जन्म झाला असेल तर त्या व्यक्तीला ही निवडणूक लढता येते. अमेरिकेबाहेर जन्म झालेला असेल आणि त्यानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या व्यक्तीला निवडणूक लढता येत नाही. मस्क यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे ते राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकत नाहीत.
दरम्यान, ट्रम्प सरकारने नुकतेच बिग ब्युटीफूल हे बिल पारित केले आहे. त्यामुळे मस्क चांगलेच भडकले आहेत. हे बिल म्हणजे घाणेरडे कृत्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. या बिलाच्या बाजूने मतदान केलेल्या खासदारांना लाज वाटायला हवी. तुम्ही चुकीचे केलेत, हे तुम्हाला माहिती आहे, असेही मस्क यांनी म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.