Elon Musk Family : इलॉन मस्कचे कुटुंबीय अयोध्येत श्रीराम चरणी लीन, काय केली प्रार्थना?

Elon Musk's Family Visits Ayodhya’s Ram Temple : अमेरिकन उद्योगपती आणि श्रीमंतांच्या जागतिक क्रमवारीत सर्वोच्च स्थानी असलेल्या इलॉन मस्क कुटुंबीयांची चर्चा.
Elon Musk Family
Elon Musk FamilySarkarnama
Published on
Updated on

Ayodhya’s Ram Temple : जगातील सर्व सुखे पायाशी असलेल्या अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्कच्या कुटुंबीयांनी अयोध्येला भेट दिली आहे. त्यांची ही भेट विशेष चर्चेचा विषय बनली आहे. या भेटीत त्यांनी विविध पुरोहितांशीही संवाद साधला. मस्क यांची टेस्ला ही बहुचर्चित इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात लाँच होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट होती, अशी चर्चा रंगली आहे.  

इलॉन मस्क हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी होते. त्यांच्या सरकारमध्ये मस्क यांच्याकडे मोठी जबाबदारी होती. पण ते नुकतेच या पदावरून पायउतार झाले आहेत. ट्रम्प यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता मस्क यांनी आपल्या उद्योगांवर पूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे.

मस्क यांच्या टेस्ला या इलेक्ट्रिक कारचे भारतात लाँचिंग करण्याचे प्रयत्न सुरू आहे. याबाबत त्यांचे वडील अरोल मस्क यांनी नुकतेच भाष्य केले होते. त्यानंतर एरोल मस्क आणि कुटुंबीयांनी नुकतीच अयोध्येला श्रीराम मंदिरात भेट दिली. त्याआधी त्यांनी हनुमान गढी येथे परंपरेप्रमाणे हनुमानाचे दर्शन घेतले. या भेटी दरम्यान त्यांनी दोन्ही ठिकाणी मनोभावे प्रार्थना केले.

Elon Musk Family
Mahua Moitra Wedding : महुआ मोइत्रांनी गुपचूप केलं लग्न; चारवेळा खासदार राहिलेल्या नेत्यासोबत थाटला संसार

हनुमान घडीचे मुख्य महंत आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष महंत ज्ञानदास महाराज, त्यांचे उत्तराधिकारी महंत संजय दास आणि हनुमान घडीचे मुख्य पुजारी महंत हेमंत दास यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी एरोल मस्क यांनी या महंतांशी चर्चा केली. अध्यात्मिक ओढीमुळे आपण अयोध्येला भेट दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Elon Musk Family
Manoj Jarange Patil : मला त्या पापात सहभागी व्हायचं नाही, संतोष भैय्यांचं प्रकरण दाबलं जातंय! जरांगे पाटलांचा आरोप

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराला यापूर्वी जगभरातील अनेक महत्वाचे नेते आणि मान्यवरांनी भेट दिली आहे. मस्क कुटुंबीयांनीही रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. त्यामुळे मस्क यांचा उद्योग भारतातही आता हातपाय पसरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com