Mahua Moitra Wedding : महुआ मोइत्रांनी गुपचूप केलं लग्न; चारवेळा खासदार राहिलेल्या नेत्यासोबत थाटला संसार

Who is Pinaki Mishra? Former BJD MP Profile : महुआ मोइत्रा यांचे पती पिनाकी मिश्रा हे बीजेडीचे आसाममधील बडे नेते म्हणून ओळखले जातात.
TMC MP Mahua Moitra ties the knot with former BJD MP Pinaki Mishra in a private ceremony, surprising political circles.
TMC MP Mahua Moitra ties the knot with former BJD MP Pinaki Mishra in a private ceremony, surprising political circles. Sarkarnama
Published on
Updated on

Mahua Moitra's Secret Wedding Revealed : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्यांनी जर्मनीत बिजू जनता दलाच्या नेत्यासोबत लग्न केले आहे. माजी खासदार पिनाकी मिश्रा असे त्यांचे नाव आहे. या दोघांनी काही जवळच्या नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत जर्मनीत लग्न केले. या विवाहाचे फोटो आता सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

महुआ आणि पिनाकी या जोडप्याने तीन मे रोजी लग्न केल्याचे समोर आले आहे. या दोघांचे फोटो व्हायरल झाले असून या दोघांनी भारतीय वेशभूषा परिधान केल्याचे आणि एकमेकांच्या हातात हात असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. लग्नाबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघांकडून अद्याप विवाहाबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

कोण आहेत पिनाकी मिश्रा?

महुआ यांचे पती पिनाकी मिश्रा हे बीजेडीचे ओडिशा मधील बडे नेते म्हणून ओळखले जातात. 66 वर्षांचे मिश्रा चारवेळा खासदार होते. ते पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर 1996 मध्ये पुरी मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. यावेळी त्यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री ब्रज किशोर त्रिपाठी यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी बीजेडीमध्ये प्रवेश केला आणि 2009, 2014, 2019 मध्येही खासदार बनले. त्याचप्रमाणे ते सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील आहे.

TMC MP Mahua Moitra ties the knot with former BJD MP Pinaki Mishra in a private ceremony, surprising political circles.
Imran Khan : इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्या मागे का लागले? पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर!

पिनाकी मिश्रा हे जवळपास तीन दशके राजकारणात असून अनेक महत्वाच्या केंद्रीय समित्यांचे सदस्यही होते. पश्चिम बंगालमधील खासदार महुआ या मुळच्या आसामच्या आहेत. त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1974 रोजी आसाममध्ये झाला होता. त्यांनी इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या 2019 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या.

TMC MP Mahua Moitra ties the knot with former BJD MP Pinaki Mishra in a private ceremony, surprising political circles.
Rahul Gandhi News : राहुल गांधींना कोर्टाने धरले धारेवर; भारतीय सैन्याविषयी बोलणे भोवणार?

पैशांच्या बदल्यात प्रश्न या प्रकरणात त्या दोषी आढळल्याने 2023 मध्ये त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. 2024 च्या निवडणुकीत त्या पुन्हा निवडून आल्या आहेत. कृष्णनगर हा त्यांचा मतदारसंघ आहे. संसदेत सरकारविरोधातील त्यांची अनेक भाषणे गाजली आहेत. या भाषणांमुळेच त्या प्रकाशझोतात आल्या.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com