ED raids : काँग्रेस आमदाराच्या घरातून 'ईडी'ला सापडलं 'घबाड'; रोकड अन् किलोमध्ये सोनं...

ED raids On Congress MLA Satish Sail : अंमलबजावणी संचालनालयाने कर्नाटकात मोठी कारवाई केलीय. ईडीने काँग्रेस आमदार सतीश सैल यांच्या घरावर छापेमारी केल्यानंतर मोठं घबाड उघड झालं आहे.
ED raids On Congress MLA Satish Sail
ED raids On Congress MLA Satish Sailsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  • काँग्रेस आमदार सतीश सैल यांच्या कुटुंबाच्या बँक लॉकरमधून 1.41 कोटी रोकड आणि 6.75 किलो सोने ईडीने जप्त केले.

  • कर्नाटक, गोवा आणि मुंबईसह 15 ठिकाणी मनी लाँड्रिंग चौकशीअंतर्गत छापेमारी झाली.

  • लोहखनिजाच्या बेकायदेशीर निर्यातीशी संबंधित प्रकरणामुळे काँग्रेसवर राजकीय दबाव वाढला आहे.

Bengaluru News : लोहखनिजाच्या कथित बेकायदेशीर निर्यातीशी संबंधित एका प्रकरणात काँग्रेसचे आमदार सतीश कृष्णा सैल आणि इतर कांही जणांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली होती. ही कारवाई बुधवारी (ता.13) मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून करण्यात आली होती. तर कर्नाटकसह गोवा आणि मुंबईतील किमान 15 ठिकाणी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) हे छापे टाकण्यात आले. या कारवाईत आता मोठी अपडेट समोर आली असून सैल यांच्या कुटुंबाच्या बँक लॉकरमधून 1.41 कोटी रुपये रोकड आणि 6.75 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. ही माहिती ईडीने दिली आहे.

काँग्रेसचे कारवारचे आमदार सैल यांच्या कंपनीने बेलेकेरी बंदरातून कथित बेकायदेशीरपणे लोहखनिज निर्यात केल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने 13-14 ऑगस्ट रोजी कारवार, गोवा, मुंबई आणि दिल्ली येथे छापे टाकले होते. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) ज्या इतर कंपन्यांची चौकशी करण्यात आली. त्यात आशापूर माइनकेम, श्री लाल महाल, स्वस्तिक स्टील्स (होसेपेट), आयएलसी इंडस्ट्रीज आणि श्री लक्ष्मी वेंकटेश्वर मिनरल्स यांचा समावेश आहे, असे ईडीने म्हटले आहे.

ED raids On Congress MLA Satish Sail
ED Raid : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण; ED ची ऐतिहासिक रेड, पहिल्यांदाच गाठले अंदमान

बंगळूर येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने या सर्व कंपन्यांना मल्लिकार्जुन शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडशी सहकार्य करून बेकायदेशीरपणे लोहखनिज निर्यात केल्याबद्दल दोषी ठरवले आहे, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. मल्लिकार्जुन शिपिंग सेल ही त्यांच्या मालकीची कंपनी असल्याचे वृत्त आहे.

विशेष न्यायालयाने दिलेल्या शिक्षेनुसार आमदार आणि इतरांविरुद्ध चौकशी सुरू असल्याचे ईडीने म्हटले आहे. तथापि, गेल्यावर्षी कर्नाटक उच्च न्यायालयाने आमदारांच्या सात वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा आदेश दिला होता. तपासादरम्यान सैलच्या निवासस्थानातून 1.41 कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले. याशिवाय श्री लाल महाल लिमिटेडच्या कार्यालयातून 27 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. सैलच्या कुटुंबाच्या बँक लॉकरमधून 6.75 किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि सोनेही जप्त करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे.

या प्रकरणात सहभागी असलेल्यांच्या बँक खात्यांमधील 14.13 कोटींची रक्कम गोठवण्यात आली. कागदपत्रे, ई-मेल, रेकॉर्ड आदी स्वरूपात पुरावेही जप्त करण्यात आले, असे त्यात म्हटले आहे.

ED raids On Congress MLA Satish Sail
ED raid update : ‘ईडी’चा अंबानींना झटका, उद्योगविश्वात खळबळ! अधिवेशन सुरू असतानाच कंपन्यांवर छापे...

FAQs :

प्र.१: ईडीने छापेमारी कुठे केली?
उ: कर्नाटक, गोवा आणि मुंबईसह 15 ठिकाणी.

प्र.२: काय जप्त करण्यात आलं?
उ: 1.41 कोटी रुपये रोकड आणि 6.75 किलो सोने.

प्र.३: कारवाई कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे?
उ: लोहखनिजाच्या कथित बेकायदेशीर निर्यात आणि मनी लाँड्रिंग प्रकरणाशी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com