EPFO: नोकरदार, पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पीएफवर मिळणार 'इतकं' व्याज, केव्हा येणार खात्यात पैसे? जाणून घ्या

EPFO: पीएफचे नियम आता बदलले आहेत त्यानुसार, नोकरी बदलल्यानंतर पीएफ अकाऊंटमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्सफर होणार आहे त्यामुळं देशातील कुठूनही तुम्हाला पेन्शन मिळू शकणार आहे.
EPFO: नोकरदार, पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पीएफवर मिळणार 'इतकं' व्याज, केव्हा येणार खात्यात पैसे? जाणून घ्या
Published on
Updated on

EPFO: नोकरदार आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी खूशखबर आहे, सरकारनं पीएफच्या खात्यात व्याज देण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी सांगितलं की, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी भविष्य निर्वाह निधीवर मिळणाऱ्या ८.२५ टक्के वार्षिक व्याज १५ जुलैपर्यंत सदस्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. यावेळी सरकार सुमारे १.४४ लाख कोटी रुपयांचं व्याज थेट ३४ कोटी नोकरदारांच्या खात्यात टाकले जात आहेत. त्याचबरोबर ईपीएफओ ने CITES 2.10 च्या नावानं एक नवा सेंट्रलाईज आयटी सिस्टीम लागू केली आहे. ज्यामुळं आता पीएफ आणि पेन्शनशी संबंधित नियम खूपच सोपे आणि पारदर्शी बनले आहेत.

EPFO: नोकरदार, पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पीएफवर मिळणार 'इतकं' व्याज, केव्हा येणार खात्यात पैसे? जाणून घ्या
Literate State: विश्वास बसणार नाही पण.. देशातील 'हे' राज्य बनलं संपूर्ण साक्षर राज्य; राज्यपालांनी केली घोषणा

खात्यात किधीपर्यंत आणि किती पैसे येणार?

श्रम मंत्र्यांच्या माहितीनुसार, सरकारच्यावतीनं मंजूर ८.२५ टक्के व्याजाला ऑटो-प्रोसेसिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खात्यांमध्ये ट्रान्सफर केलं जात आहे. फील्ड अधिकाऱ्यांचं व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाणार आहे. तुम्ही १५ जुलैपर्यंत आपल्या ऑनलाईन पासबूकमध्ये क्रेडिट करण्यात आलेली रक्कम पाहू शकाल. विशेष गोष्ट ही आहे की, आधी व्याजाची ही प्रक्रिया ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत रखडली जायची, पण आता नव्या सिस्टिममुळं याला महिन्याभरातच मार्गी लावलं जाणार आहे.

EPFO: नोकरदार, पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पीएफवर मिळणार 'इतकं' व्याज, केव्हा येणार खात्यात पैसे? जाणून घ्या
Building Collapsed : पिंपरी-चिंचवडमध्ये सततच्या पावसामुळं इमारत कोसळली! १४ जण अडकल्याची भीती

बँकांप्रमाणं देशात आता कुठूनही मिळणार पीएफ सेवा

आता पीएफचं खातंही तुमच्या बँक खात्याप्रमाणं काम करणार आहे. यापूर्वी ईपीएफओची रचना ही विकेंद्रीकृत होती तसंच प्रत्येक क्षेत्रीय कर्यालयाचा वेगळा डेटाबेस होता. आता संपूर्ण डेटाला केंद्रीय टेडाबेसमध्ये बदलण्यात आलं आहे. यामोठ्या बदलांमुळं आता सदस्यांना कोणत्याही विशेष क्षेत्रीय कार्यालयांच्या चकरा मारण्याची गरज नाही, देशातील कुठल्याही अधिकृत ठिकाणाहून ते आपल्या पीएफ सेवेचा लाभ घेऊ शकतात. केवळ एका सिंगल डिजिटल इंटरफेसच्या माध्यमातून तुम्ही तुमचं पासबूक, क्लेम स्टेटस आणि पेंशन सर्व्हिस रेकॉर्ड सहजतेनं ट्रॅक करु शकता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com