Parliament Winter Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 'इंडिया' आघाडीला धक्का देण्याची सरकारची तयारी

INDIA Alliance : लोकसभेच्या एथिक्स कमिटीकडून पैसे घेऊन प्रश्न विचाल्याप्रकरणी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर ठपका ठेवला असून, त्याबाबतचा अहवाल सोमवारीच लोकसभेत सादर केला जाणार आहे.
India Alliance
India Alliance Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशातील चार राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर (Assembly Elections Results 2023) दुसऱ्याच दिवशी सोमवारी (ता. ४) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला (Parliament Winter Session) सुरुवात होत आहे. या निकालात मतदार कुणाला कौल देणार, हे काही तासांतच स्पष्ट होईल. पण मोदी सरकारने मात्र 'इंडिया' आघाडीला (INDIA Alliance) अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धक्का देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लोकसभेच्या एथिक्स कमिटीकडून (Ethics Committee) पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी खासदार महुआ मोईत्रा (MP Mahua Moitra) यांच्यावर ठपका ठेवला असून, त्याबाबतचा अहवाल सोमवारीच लोकसभेत (Lok Sabha) सादर केला जाणार आहे.

महुआ मोईत्रा या इंडिया आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. संसदेसह सभागृहाबाहेरही त्या सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारवर आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. मात्र, पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणात त्या बॅकफूटवर गेल्या आहेत. एथिक्स कमिटीचे अध्यक्ष विनोदकुमार सोनकर हे याबाबतचा अहवाल संसदेच्या पटलावर सादर करणार आहेत. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

India Alliance
Madhya Pradesh Election : 'लाडली बेहना' शिवराज सिंह चौहान यांना 'मामा' बनवणार?

भाजपकडूनही पहिल्या दिवशी विरोधकांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे. अहवालावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून पहिल्याच दिवशी निर्णय दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोईत्रा यांच्यावरील आरोप अत्यंत गंभीर असल्याने त्यांचे खासदारकी रद्द करण्याची किंवा निलंबन करण्याची शिफारस समितीने केली आहे. त्यानुसार अध्यक्षांनी निर्णय घेतल्यास मोईत्रा यांच्यासह तृणमूल आणि इंडिया आघाडीला मोठा धक्का बसू शकतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, शनिवारी (दि. २) सकाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला २३ पक्षांचे ३० नेते उपस्थित होते. अधिवेशन २२ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून, गृह विभागाच्या तीन विधेयकांसह एकूण १९ विधेयके अधिवेशनात सादर केली जाणार असल्याची माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. त्याचप्रमाणे महुआ मोईत्रा प्रकरणावर एथिक्स कमिटीमध्ये चर्चा झाली आहे. आता संसदेत काय निर्णय घ्यायचा हे अध्यक्ष ठरवतील, असेही जोशी यांनी स्पष्ट केले.

India Alliance
Betting On Five states : पाच राज्यांवर सट्टाबाजाराचे आकडे; फेव्हरेट कोण? भाजप की काँग्रेस ?

सर्वपक्षीय बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी महुआ मोईत्रा यांचाही मुद्दा उपस्थित केल्याचे समजते. संसदीय समितीचे अहवाल सभागृहात सादर करण्यापूर्वीच सार्वजनिक केले जात आहेत. काही सदस्य निलंबित असून, आमच्या पक्षाच्या एक लोकसभा सदस्य लवकरच निलंबित केल्या जाणार आहेत. या मुद्द्यावर संसदेत चर्चा होऊ शकते. चर्चेनंतर निर्णय घेण्याचा संसदेला अधिकार आहे, अशी भूमिका तृणमूलच्या नेत्यांनी बैठकीत मांडल्याचे वृत्त आहे.

(Edited By - Rajanand More)

India Alliance
Bhupesh Baghel : मुख्यमंत्र्यांचे थेट पंतप्रधानांना पत्र; ऑनलाइन जुगाराबाबत केली मोठी मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com