Priyanka Gandhi News: मोठी बातमी! सस्पेन्स संपला,प्रियांका गांधींना वायनाडमधून उमेदवारी

Waynad By Poll Election 2024 : केरळमध्ये विधानसभेच्या दोन जागांवर पोटनिवडणूक होत आहे. पक्षाने पलक्कड आणि चेलाक्कर या ठिकाणी देखील उमेदवार जाहीर केले आहे.
Priyanka Gandhi
Priyanka GandhiSarkarnama
Published on
Updated on

Congress News : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधींनी केरळच्या वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. रायबरेलीतून राहुल यांना 3 लाख 90 हजारांचे तर वायनाडमध्ये 3 लाख 64 हजारांच्या मताधिक्य मिळाले आहे.

त्यावेळी त्यांनी रायबरेली ही गांधी घराण्याची पारंपारिक जागा निवडली आणि वायनाडची जागा सोडली. त्या जागेवरच आता काँग्रेसकडून पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

राहुल गांधी Rahul Gandhi 2019 मध्ये वायनाडमधून निवडून आले होते. यावेळी त्यांनी वायनाडसह रायबरेलीतूनही बाजी मारली. रायबरेलीतून राहुल यांना 3 लाख 90 हजारांचे तर वायनाडमध्ये 3 लाख 64 हजारांच्या मताधिक्य मिळाले आहे.

परिणामी दोन्हीपैकी कोणता मतदारसंघ निवडायचा याबाबत राहुल गांधींसह काँग्रेसपुढे भावनिक पेच निर्माण झाला होता. यातून मार्ग काढत खर्गे यांनी राहुल गांधी वायनाडमधून राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. तर त्या जागेवरून प्रियांका गांधी लढणार असल्याचीही घोषणा केली.

Priyanka Gandhi
Sharad Pawar News : शरद पवारांच्या 'मॅरेथॉन' भेटीगाठी; 'तुतारी' फुंकण्यासाठी इच्छुक नेत्यांची रीघ

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता त्यांना 14 दिवसांच्या आत एका जागेची निवड करणे बंधनकारक होते.

त्यानुसार राहुल गांधी आता केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. तर त्यांच्या रिक्त जागी वायनाडमधून प्रियांका गांधी लढणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते.

Priyanka Gandhi
Eknath Shinde News : निवडणुकीची घोषणा होताच CM शिंदेंचा मोठा दावा; म्हणाले,'आमचं सरकार पूर्ण बहुमतानं...'

काँग्रेस Congress नेत्यांनी विचारमंथन केल्यानंतर उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून राहुल गांधींनी खासदार म्हणून काम करण्याचे ठरवले होते. रायबरेली आणि गांधी घराण्याचे जवळचे संबंध आहेत. तसेच हा मतदारसंघ जवळचा पडतो.

रायबरेलीतील लोकांचेही त्याला समर्थन आहे. तसेच वायनाडमधील लोकांनीही राहुल यांनी रायबरेलीतून खासदार राहण्याचा सल्ला दिला. त्यातूनच हा निर्णय घेणे सोपे झाल्याचेही खर्गेंनी स्पष्ट केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com