
Mumbai News : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पक्षसंघटनेची नव्याने बांधणी करण्यास सुरूवात केली आहे. राज्यासह राष्ट्रीय स्तरावरही नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना, तरूणांना संधी दिली जात आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी फहाद अहमद यांच्यावर राष्ट्रीय पातळीवरील मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शुक्रवारी फहाद अहमद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव राजीव कुमार झा यांनी नियुक्तीचे पत्र काढले आहे. पक्षाचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचेही पत्रात म्हटले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या मान्यतेनंतर ही नियुक्ती करण्यात आल्याचेही झा यांनी नियुक्ती पत्रात नमूद केले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. आता पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी पक्षाने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे.
फहाद अहमद यांनी मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सना मलिक यांच्याकडून ते पराभूत झाले. फहाद हे मुळचे उत्तर प्रदेशातील आहेत. निवडणुकीआधी ते समाजवादी पक्षात होते. समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभेचे महाराष्ट्र प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
फहाद यांचे वडीलही समाजवादी पक्षाचे नेते आहेत. उमेदवारी मिळण्यापूर्वीच फहाद यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता थेट त्यांना युवकचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. अभिनेत्रा स्वरा भास्कर या फहाद यांच्या पत्नी आहेत. या विवाहानंतर फहाद अहमद अचानक चर्चेत आले होते. फेब्रुवारी 2023 मध्ये दोघांचा विवाह झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.