Revanth Reddy News : अमित शाहांचा ‘तो’ व्हिडिओ काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना भोवणार; दिल्ली पोलिसांची नोटीस

Amit Shah News : अमित शाह यांचा आरक्षणावर बोलतानाचा एक व्हिडिओ रेड्डींनी सोशल मीडियात शेअर केला होता. तसेच काँग्रेसच्या इतर काही पदाधिकाऱ्यांकडूनही हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता.
Amit Shah, Revanth Reddy
Amit Shah, Revanth ReddySarkarnama

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी (Revanth Reddy News) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका व्हिडिओसंदर्भात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी रेड्डी यांना समन्स बजावून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) एक मेला रेड्डींना बोलावले आहे. तसेच सोबत येताना ते वापर असलेला मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन येण्यास सांगितले आहे. रेड्डी यांच्यासह काँग्रेसचे (Congress) काही नेते आणि इतर असे एकूण पाच जणांचा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या प्रकरणात यापूर्वीच एकाला आसाममधून अटक करण्यात आली आहे.

Amit Shah, Revanth Reddy
Congress News : काँग्रेस उमेदवार 'बम' यांचा धमाका; उमेदवारी अर्ज मागे घेत थेट भाजपमध्ये प्रवेश

आरक्षणाबाबत अमित शाह (Amit Shah) यांना बनावट व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. रेड्डींना हा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करत भाजपवर निशाणा साधला होता. तसेच काँग्रेसच्या इतर नेत्यांकडूनही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. त्यावर भाजप आणि गृह मंत्रालयाकडून दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

 (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून भारतीय दंड संहितातील विविध कलमांसह आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओमध्य छेडछाड करून समाजामध्ये वाद निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियात शेअर करण्यात येत आहे. त्यामुळे समाजातील शांतता बिघडण्याची शक्यता आहे, असे ‘एफआयआर’मध्ये नमूद करण्यात आले आहे.  

रेड्डींनी केली होती टीका

मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी आरक्षणावरून भाजपवर (BJP) निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, 2025 मध्ये ‘आरएसएस’ला (RSS) शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे यावर्षी  ते एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण बंद करतील. आरएसएस आणि भाजप नेत्यांनी अनेकदा आरक्षणाबाबत  विधानं केली आहेत.

मागासवर्गीयांना आरक्षण देण्याबाबतचा मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला भाजपने विरोध केला होता, असे सांगत रेड्डी म्हणाले, लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) 400 हून अधिक जागा मिळून एससी, एसटी आणि मागासवर्गीय घटकांचा कोटा रद्द करण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कारी पक्ष त्यांना मदत करत आहेत, अशी टीका रेड्डींनी केली होती.

R

Amit Shah, Revanth Reddy
PM Narendra Modi News : लवकरच काँग्रेसमधील गृहकलह रस्त्यावर! पंतप्रधान मोदींचं भाकित

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com