Congress News : काँग्रेस उमेदवार 'बम' यांचा धमाका; उमेदवारी अर्ज मागे घेत थेट भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 : काही दिवसांपूर्वी सुरत मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध झाली असून, भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला होता.
Kailash Vijayvargiya, Akshay Kanti Bamb
Kailash Vijayvargiya, Akshay Kanti BambSarkarnama

New Delhi News : गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघानंतर काँग्रेसला (Congress News) आता मध्य प्रदेशातही मोठा धक्का बसला आहे. इंदौर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अक्षय कांती बम यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. एवढेच नाही तर अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनीच ही माहिती दिली.

विजयवर्गीय यांनी अक्षय बम (Akshay Kanti Bamb) यांच्यासोबतचा एक सेल्फी सोशल मीडियात शेअर करत काँग्रेसवर बॉम्ब टाकला आहे. तसेच त्यांनी म्हटले आहे की, इंदौरमधील काँग्रेसचे लोकसभा (Lok Sabha Election 2024) उमेदवार अक्षय कांती बम यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री मोहन यादव आणि प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये (BJP) स्वागत आहे.

Kailash Vijayvargiya, Akshay Kanti Bamb
PM Narendra Modi News : लवकरच काँग्रेसमधील गृहकलह रस्त्यावर! पंतप्रधान मोदींचं भाकित

इंदौर मतदारसंघातील (Indore Lok Sabha Constituency) निवडणुकीसाठी 25 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्यात आले होते. अर्ज मागे घेण्याची मुदत 29 एप्रिल आहे. आज शेवटच्या दिवशी बम यांनी उमेदवारी अर्ज घेत काँग्रेसला धक्का दिला. यामागे विजयवर्गीय यांचे प्लॅनिंग असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. भाजपने या मतदारसंघात शंकर लालवानी यांना उमेदवारी दिली आहे.   

 (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इंदौरची निवडणूकही बिनविरोध?

सुरत मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुकेश दलाल (Mukesh Dalal) बिनविरोध निवडून आले आहेत. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांच्यासह डमी उमेदवाराचा अर्जही बाद झाला होता. त्यांच्या शपथपत्रावरील तीन सूचकांच्या सह्या बिनविरोध असल्याची तक्रार भाजपने केली होती. तसेच तीन सूचकांनी आपल्या सह्या नसल्याचे प्रतिज्ञापत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिले होते. त्यानंतर उर्वरित अपक्ष व इतर छोट्या पक्षांच्या उमेदवारांनीह निवडणुकीतून माघार घेतली.

निवडणुकीत एकही उमेदवार न उरल्याने दलाल यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी घोषित केले. आता इंदौरमध्येही काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. भाजपकडून इंदौर मतदारसंघाची निवडणूकही बिनविरोध करण्याच प्रयत्न असल्याची जोरदार चर्चा आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही, हे स्पष्ट होईल.

R

Kailash Vijayvargiya, Akshay Kanti Bamb
Sanjay Singh News : भाजपमध्ये चालते भागवतांचे संविधान! संजय सिंह यांचा घणाघात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com