Bharat Bandh : शेतकऱ्यांनो, शेतात काम करू नका! राकेश टिकैत यांच्याकडून ‘भारत बंद’ची हाक

Rakesh Tikait : मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात टिकैत यांच्या नेतृत्वाखाली वर्षभर सुरू होते आंदोलन...
Rakesh Tikait
Rakesh TikaitSarkarnama
Published on
Updated on

Rakesh Tikait Called Bharat Band : संयुक्त किसान मोर्चाने विविध मागण्यांसाठी भारत बंदची हाक दिली आहे. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी 16 फेब्रुवारी रोजी भारत बंदची घोषणा केली. या दिवशी शेतकऱ्यांनी शेतात काम करू नये, असे आवाहनही टिकैत यांनी केले आहे.

मोदी सरकारने (Modi Government) आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात टिकैत यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन उभे करण्यात आले होते. जवळपास वर्षभर हे आंदोलन चालले होते. त्यानंतर सरकारला तीनही कायदे मागे घ्यावे लागले होते. या आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटले होते.

Rakesh Tikait
India Alliance : काही तासांतच ‘इंडिया’ला दुसरा मोठा धक्का; ममतांनंतर आणखी एका मुख्यमंत्र्यांची घोषणा

या आंदोलनानंतर पुन्हा एकदा टिकैत (Rakesh Tikait) यांनी आंदोलनाची हाक दिल्याने मोदी सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. टिकैत यांनी पुन्हा किमान आधारभूत किंमत म्हणजे हमीभावाचा मुद्दा पुढे करीत भारत बंदची (Bharat Bandh) घोषणा केली आहे. 16 फेब्रुवारी रोजी भारत बंद असेल, असे त्यांनी जाहीर केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी हमीभावाप्रमाणेच बेरोजगारी, अग्निवीर योजना, जुनी पेन्शन योजना आदी मुद्यांवर केंद्र सरकारला घेरले जाणार असल्याचे टिकैत यांनी सांगितले. यादिवशी शेतकऱ्यांनी शेतात काम करू नये. तसेच दुकानदारांनी दुकाने बंद ठेवावीत. एक दिवस शेतकरी आणि मजुरांसाठी द्यावा, असे आवाहन टिकैत यांनी केले आहे.

वाहतूकदारांनाही बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या बंदमध्ये संयुक्त किसान मोर्चासह इतर अनेक संघटनाही सहभागी झाल्या आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच टिकैत यांनी ही घोषणा केल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.  

R...

Rakesh Tikait
CM Mamata Banerjee : ममता बॅनर्जी थोडक्यात बचावल्या; वाहन अपघातात डोक्याला दुखापत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com