India Alliance : काही तासांतच ‘इंडिया’ला दुसरा मोठा धक्का; ममतांनंतर आणखी एका मुख्यमंत्र्यांची घोषणा

CM Bhagwant Mann : मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे जाहीर केले आहे.
India Alliance
India AllianceSarkarnama
Published on
Updated on

Congress : इंडिया आघाडीच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला पराभवाची धुळ चारण्याची स्वप्नं पाहणाऱ्या विरोधकांच्या एकीला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सकाळीच केली. त्यानंतर आणखी एका पक्षाने काँग्रेसला धक्का दिला आहे.

विरोधकांची वज्रमूठ केलेल्या काँग्रेसला (Congress) काही तासांतच दुसरा मोठा धक्का बसला आहे. आघाडीतील दुसरा मोठा पक्ष असलेल्या आम आदमी पक्षानेही (AAP) आघाडीतून अंग काढून घेण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे नेते व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबमध्ये (Punjab) काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

India Alliance
India Alliance : ‘इंडिया’मध्ये फूट? जागावाटप सुरू असतानाच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

ममतांच्या भूमिकेनंतर बोलताना मान यांनी सांगितले की, पंजाबमध्ये आम्ही आघाडी करणार नाही. काँग्रेसशी आमचे काही देणे-घेणे नाही. राज्यातील सर्व 13 जागांवर आपचा विजय होईल, असेही मान यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे पश्चिम बंगालपाठोपाठ पंजाबमध्येही आता आघाडीत फूट पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केजरीवालांनी पंजाबमध्ये सर्व 13 जागा लढविण्याच्या प्रस्तावाला संमती दिल्याचे समजते. काँग्रेसच्या जागावाटपाबाबतच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आपकडून एकला चलोचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. ममतांनीही काँग्रेसवरच ठपका ठेवला आहे. जागावाटपाबाबत अनेकदा प्रस्ताव पाठवूनही फेटाळण्यात आल्याने स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल आणि पंजाब या राज्यांमध्ये इंडिया आघाडीत फूट पडल्याने आता काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. आपची दिल्लीतही सत्ता आहे. पण तिथे अजूनही दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. पण पंजाबमध्ये मान यांनी काँग्रेसला चार हात लांब ठेवण्याची भूमिका घेतल्याने आघाडीत नेमकं काय सुरू आहे, याबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.   

R...

India Alliance
India Alliance : ममतांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर ‘इंडिया’चे धाबे दणाणले; आता घातल्या पायघड्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com