Reasi Bus Attack : नॅशनल कॉन्फरसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी रियाशी दहशतवादी हल्ल्यावरून मोठं विधान केलं आहे. नक्कीच राज्याच्या सुरक्षेत सुधारणा झाली आहे, परंतु दहशतवादी हल्ले तोपर्यंत सुरू राहतील, जोपर्यंत पाकिस्तानशी लगत असलेल्या सीमावर्ती भागातून घुसखोरी सुरूच राहील.
त्यांनी रियासीमध्ये भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आणि म्हटले की देवाने अशा लोकांना पाठवावे की जे अशी कृत्य करणाऱ्यांना नरकाचा रस्ता दाखवतील.
मंगळवारी बारामुल्लामध्ये माध्यमांशी चर्चेत फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी म्हटले की, नक्कीच येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुधारणा झाल्या आहेत, परंतु इथे दहशतवादही आहे. आपल्या सीमा अद्यापही पूर्णपणे बंद नाहीत, तिथे घुसखोरी सुरू आहे.
सीमा पूर्णपणे सील केल्या जावू शकत नाहीत. तुम्ही प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवू शकत नाही. पाकिस्तानशी लगत असलेली आंतरराष्ट्रीय सीमा व एलओसीवर घुसखोरी होते आणि जोपर्यंत हे बंद होत नाही, तोपर्यंत दहशतवादी हल्ले थांबणार नाहीत.
रियासीमध्ये भाविकांवर हल्ल्याच्या घटनेबाबत विचारले असता, ते म्हणाले की हे एक निंदनीय कृत्य आहे. जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक नागरिकाने या कृत्याची निंदा केली पाहिजे. यामध्ये जे कोणी सहभागी असतील ते जम्मू-काश्मीर, इस्लाम आणि मानवतेचे सर्वात मोठे शत्रू आहेत.
याशिवाय त्यांनी या महिन्याच्या अखेरीस सुरू होत असलेल्या श्री अमरनाथाच्या पवित्र गुफेच्या वार्षिक तीर्थयात्रेचा उल्लेख करत म्हटले की, जम्मू-काश्मीरची जनता भाविकांच्या स्वागतासाठी तयार आहे.
या आधी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पीओके म्हणजे पाकव्याप्त काश्मीरचे भारतात विलीनीकरण होईल, असे विधान केले होते. त्यावरून फारूख अब्दुल्ला चांगलेच भडकले होते. पाकिस्तानने बांगड्या घातलेल्या नाहीत. त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत, जे आमच्यावर टाकतील, असे अब्दुल्ला म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर वाद निर्माण झाला होता आणि भाजपने चांगलेच फटकारले होते.
(Edited by- Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.