
Delhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मोदी आडनावाची बदनामी केल्याचा ठपका ठेऊन गुजरात न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांच्यावर कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द केली. त्यामुळे राहुल गांधी राहत असलेले 12 तुघलक लेनवरील घर त्यांना रिकामं करावं लागलं होतं. पण आता पुन्हा एकदा त्यांना दिल्लीत घर मिळालं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 22 एप्रिल रोजी त्यांचे दिल्लीतील त्यांचं घर रिकामं केलं होतं. त्यानंतर गांधी हे 10 जनपथ रोड या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी राहायला गेले होते. पण याचदरम्यान, त्यांची नवीन घरासाठी जोरदार शोध मोहीम सुरु होती. आता राहुल गांधी यांना अखेर घर (Rahul Gandhi)मिळालं आहे. दक्षिण दिल्लीतील निझामुद्दीन पूर्वमध्ये असलेल्या थ्री बीएचके घरामध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित ( Sheila Dikshit) यांच्या मालकीचं हे घर असून त्यांच्या आयुष्यातील अखेरचे दिवस या निवासस्थानी मुक्कामी होत्या. हे घर थ्री बीएचके असून एकूण 1500 स्क्वेअर फूट असल्याची माहिती आहे. याच घरामध्ये
आता राहुल गांधी यांचा मुक्काम असणार आहे. दीक्षित यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र आणि दिल्लीचे माजी खासदार संदीप दीक्षित हे या घरात वास्तव्याला होते. पण आता राहुल गांधी या घरी राहायला येणार असल्याने त्यांनी हे घर रिकामं केल्याची माहिती आहे. राहुल गांधी या ठिकाणी भाड्याने राहणार आहेत.
उच्च न्यायालयाचा राहुल गांधी यांना दिलासा नाहीच...
गुजरात उच्च न्यायालयाने मोदी आडनावाबाबत मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलेले काँग्रेस(Congress) चे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची शिक्षेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली होती. याविरोधात अखेरचा पर्याय म्हणून राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षेला स्थगिती देण्याबाबत सर्व पर्याय संपुष्टात आल्याखेरीज राहुल गांधींना अटक न करण्याचा आदेश सूरत सत्र व जिल्हा न्यायालयाने दिला होता. राहुल गांधींना जामीन देण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर निर्णय येईपर्यंत त्यांना तुरुंगात जावे लागणार नाही.
मात्र, उच्च न्यायालयाने दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली नसल्याने राहुल गांधी यांना खासदारकी परत मिळण्याची शक्यता तूर्त तरी दुरावली आहे. त्यामुळे २० जुलै रोजी सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राहुल गांधींना संसदेत उपस्थित राहता येणार नाही.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.