अमित शहांचा महिला IAS अधिकाऱ्यासोबतचा फोटो व्हायरल करणं निर्मात्याला पडलं महागात

पूजा सिंघल यांना ईडीने नुकतीच अटक केली आहे. त्या झारखंडच्या खाण विभागाच्या सचिव होत्या. अटक केल्यानंतर त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
FIR against filmmaker Avinash Das
FIR against filmmaker Avinash DasSarkarnama
Published on
Updated on

अहमदाबाद : भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाने अटक केलेल्या झारखंडमधील IAS अधिकारी पूजा सिंघल यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. चित्रपट निर्माते अविनाश दास यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्यावर गुजरातमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (HM Amit Shah Latest Marathi News)

अहमदाबाद पोलिसांनी दास यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेतील कमल 469 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियमांतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (FIR against filmmaker Avinash Das)

FIR against filmmaker Avinash Das
केतकी चितळेसाठी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान उतरले मैदानात

पूजा सिंघल यांना ईडीने नुकतीच अटक केली आहे. त्या झारखंडच्या खाण विभागाच्या सचिव होत्या. अटक केल्यानंतर त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. मनरेगा योजनेमधील निधीत अफरातफर केल्याचा आरोप सिंघल यांच्यावर आहे. त्यांच्यासोबतचा अमित शहांचा फोटो दास यांनी फेसबुकवर शेअर केला होता.

अहमदाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दास यांनी आठ मे रोजी ट्विटरवरून अमित शहा आणि सिंघल यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाच वर्षांपुर्वीचा एका सार्वजनिक कार्यक्रमातील आहे. पण दास यांनी लोकांची दिशाभूल करणे आणि मंत्र्यांची मानहानी करण्यासाठी हा फोटो ट्विट केला.

FIR against filmmaker Avinash Das
मेधा सोमय्या उचलणार मोठं पाऊल; राऊतांना आणणार जेरीस

दरम्यान, अभिनेत्री केतकी चितळे हिच्या वादग्रस्त फेसबुक पोस्टनंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. न्यायालयाने तिला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केतकीच्या या पोस्टनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच भाजप प्रवक्त्यांना मारतानाचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला. यावरून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान मैदानात उतरले आहेत.

प्रधान यांनी सोमवारी ट्विट करत शरद पवार यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला आहे. मागील काही दिवसांत सोशल मीडियावरून पोस्टवरून झालेल्या कारवायांच्या अनुषंगाने त्यांनी हे ट्विट केले आहे. आपण मानहानीकारक किंवा तेढ पसरवणाऱ्या पोस्टच्या बाजूने नसल्याचे सांगत त्यांनी पवार व केजरीवाल यांनी ही प्रकरणे खूप ताणल्याचे प्रधान यांनी म्हटलं आहे. (Ketaki Chitale Latest Marathi News)

भाषण स्वातंत्र्याचे पुरस्कर्तेच आत अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी खरे धोकादायक आहेत. महाविकास आघाडीपासून आप, टीएमसी तसेच सर्वच विरोधी पक्षांतील नेते टीका आणि फालतू सोशल मीडिया पोस्टविषयी टोकाची भूमिका घेत आहेत. मी मानहानीकारक आणि तेढ पसरवणाऱ्या पोस्टचे समर्थन करत नाही. पण शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांनी खूपच ताणलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com