FIR against Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधात FIR दाखल; संसद आवारात धुक्काबुक्की प्रकरण!

Rahul Gandhi FIR Parliament Scuffle : भाजप खासदार बांसुरी स्वराज, हेमंग जोशी आणि अनुराग ठाकूर यांच्या तक्रारीवरून संसंद मार्ग पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला गेला.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: संसद भवन परिसरात धक्काबुक्की प्रकरणी राहुल गांधींविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. तेच काँग्रेसकडून केल्या गेलेल्या तक्रारीवर पोलीस अद्याप विचार करत आहेत. हा एफआयआर भाजप खासदार बांसुरी स्वराज, हेमंग जोशी आणि अनुराग ठाकूर यांच्या तक्रारीवरून संसंद मार्ग पोलीस ठाण्यात दाखल केला गेला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधासाठी विरोधक आक्रमक झाले असताना, ते संसद परिसरात सत्ताधीर पक्षाच्या आमदारांशी भिडल्याचेही दिसून आले आणि याचवेळी खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली तर काहीजण जखमीही झाले आहेत. संसरद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल केला गेला आहे.

भाजपचा (BJP) आरोप आहे की, लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केली. ज्यामुळे त्यांचे ज्येष्ठ खासदार प्रताप सारंगी जखमी झाले. सारंगी यांना राममनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले गेले आहे. तर दुसरीकडे राहुल गांधींनी दावा केला आहे की, भाजप खासदारांनी त्यांना आणि अन्य विरोधी पक्षाच्या खासदारांना संसदेत जाण्यापासून रोखले होते आणि धक्काबुक्कीही केली गेली.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : नव्या फौजदारी कायद्यातील ‘या’ 6 गंभीर कलमांच्या कचाट्यात राहुल गांधी अडकणार?

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) म्हटले की, मी संसदेत जाण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु, भाजपचे खासदार मला रोखण्याचा प्रयत्न करत होते, धक्का देत होते आणि धमकावतही होते. राहुल गांधींनी असेही सांगितले की, खर्गे आणि प्रियंका गांधींसोबतही धक्काबुक्की झाली. परंतु यामुळे विरोधी पक्षांना फरक पडणार नाही. ही संसद आहे आणि आत जाणे आमचा अधिकार आहे. त्यांनी म्हटले की, मुख्य मुद्दा हा आहे की, संविधान आणि बाबासाहेबांच्या स्मृतीचा अपमान झाला आहे.

Rahul Gandhi
Dr Babasaheb Ambedkar Row : संसदेच्या आवारात घमासान; भाजप खासदार ICU मध्ये; केंद्रीय मंत्री रुग्णालयात पोहचले

गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी मोर्चा काढला होता, तर भाजप खासदारांनीही काँग्रेसवर बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप करत आंदोलन सुरू केले होते. संसद भवनाजवळ मकर द्वार जवळ सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे खासदार आमनेसामने आले आणि यानंतर मग जोरदार घोषणाबाजी व पुढे धक्काबुक्की सुरू झाली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com