Dr Babasaheb Ambedkar Row : संसदेच्या आवारात घमासान; भाजप खासदार ICU मध्ये; केंद्रीय मंत्री रुग्णालयात पोहचले

Parliament Protests Turn Violent : राहुल गांधी यांनी धक्का दिल्याने खासदार पडल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.
Rahul Gandhi, Pratap Sarangi
Rahul Gandhi, Pratap SarangiSarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi : संसदेच्या आवारात गुरूवारी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि भाजपचे खासदार एकमेकांविरोधात उभे ठाकल्यानंतर धक्काबुक्की झाल्याचा आरोप दोन्ही बाजूने केला जात आहे. मात्र, या झटापटीत भाजपच्या एका खासदाराची प्रकृती बिघडल्याने त्यांना थेट अतिदक्षत विभागात दाखल करावे लागले आहे.

भाजपचे खासदार मुकेश राजपूत यांना दिल्लीतील आयएमएल रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. त्याचप्रमाणेच याच रुग्णालयात भाजपचे दुसरे खासदार प्रताप सारंगी यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्का दिल्याने राजपूत हे सारंगी यांच्या अंगावर पडले. त्यानंतर सारंगी खाली पडून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. तर राजपूत यांनाही दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून राजपूत यांच्या प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

Rahul Gandhi, Pratap Sarangi
Parliament Winter Session : मोठी बातमी : संसदेत भाजप खासदाराच्या डोक्याला गंभीर दुखापत; राहुल गांधींना धक्काबुक्की

दरम्यान, दोन्ही खासदारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि प्रल्हाद जोशी रुग्णालयात दाखल झाले आहे. तर राहुल गांधी यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. भाजप खासदारांनी आपल्याला संसदेत जाण्यापासून रोखले. त्यांनीच आपल्याला धक्काबुक्की केल्याचा दावा राहुल यांनी केला आहे. दोन्ही बाजूने धक्काबुक्कीचा आरोप होत असल्याने संसद आवारातील वातावरण चांगलेच तापले आहे.

Rahul Gandhi, Pratap Sarangi
Ramdas Athawale : डॉ. आंबेडकरांबाबतच्या 'त्या' वक्तव्याप्रकरणी आठवलेंकडून अमित शहांची पाठराखण तर काँग्रेसवर हल्लाबोल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून त्यांची राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी दोन दिवसांपासून संसदेच्या आवारात आंदोलन केले जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज भाजप खासदारांनीही आंदोलनाचा पवित्रा घेतला. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी खासदार आमनेसामने आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.