Rahul Gandhi : नव्या फौजदारी कायद्यातील ‘या’ 6 गंभीर कलमांच्या कचाट्यात राहुल गांधी अडकणार?

Congress BJP Parliament Winter Session : भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच एका महिला खासदारानेही सभापतींकडे तक्रार दिली आहे.
Rahul Gandhi, BNS
Rahul Gandhi, BNSSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजपच्या दोन खासदारांवर रुग्णालयात उपचार सुरू असून राहुल गांधींनी धक्काबुक्की केल्याने दुखापत झाल्याचा आरोप भाजपने केले आहे. राहुल यांनी हा आरोप फेटाळून लावला असला तरी भाजपने त्यांच्याविरोधात आता पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

भारतीय न्याय संहिता या नव्या फौजदारी कायद्यातील काही गंभीर कलमांतर्गत राहुल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने तक्रारीत केली आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचे कलम आहे ते 109. या कलमांतर्गत राहुल यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने केली आहे. राहुल यांनी जाणूनबुजून खासदारांना धक्का दिल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Rahul Gandhi, BNS
Dr Babasaheb Ambedkar Row : आता देशभरात चळवळ उभी राहणार! शहांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक

भाजप खासदार अनुराग ठाकूरांसह इतर काही खासदारांनी संसद मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये आणखी पाच कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामध्ये कलम 115 (जाणूनबुजून दुखापत करणे), कलम 117 (जाणूनबुजून गंभीर दुखापत करणे), कलम 121 (सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या कर्तव्यापासून विचलित करण्यासाठी दुखापत करणे), कलम 351 (धमकावणे) आणि कलम 125 (दुसऱ्यांची सुरक्षा धोक्यात टाकणे) या कलमांचा समावेश आहे.  

भाजपने काढली राहुल गांधींची लायकी

राहुल गांधी हे विरोधी पक्षनेतेपदाच्या लायकीचे नसल्याचे विधान केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे. एका आदिवासी महिला खासदाराशी त्यांच्या वागणूक अशोभनीय असल्याची टीकाही चौहान यांनी केली आहे. संसदेच्या मकर दरवाजावर भाजप खासदारांचे आंदोलन सुरू असतानाच ते तिथे आली. एका बाजूने त्यांना जाण्यासाठी जागा असतानाही भाजप खासदारांमध्ये ते घुसल्याचा आरोपही चौहान यांनी केला आहे.

Rahul Gandhi, BNS
Rahul Gandhi : महिला खासदार सभापतींसमोर रडल्या, राहुल गांधींवर गंभीर आरोप; म्हणाल्या, मी ‘अनकम्फर्टेबल’ झाले...

काँग्रेसही आक्रमक

काँग्रेसकडूनही भाजप खासदारांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भाजप खासदारांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच भाजप खासदारांच्या हाता काठ्या होत्या, असा आरोपही काँग्रेसने केला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात चळवळ उभी करणार असल्याचे खर्गे यांनी पत्रकार परिषद म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com