Pralhad Joshi on Farmers Agitation : केंद्र सरकार अन् शेतकऱ्यांमधील बैठकीबाबत केंद्रीयमंत्री जोशींनी दिली महत्त्वाची माहिती!

Farmer leader Dallewal hunger strike : शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी उपोषणाबाबत स्पष्ट केली भूमिका, म्हणाले.
Pralhad Joshi on Farmers Agitation
Pralhad Joshi on Farmers Agitationsarkarnama
Published on
Updated on

Central Government Farmers Meeting : ''सरकार आणि शेतकरी नेत्यांसोबत शुक्रवारी अतिशय सकारात्मक बैठक झाली. शेतकऱ्यांनी बैठकीत आपल्या मागण्या मांडल्यानंतर सरकारनेदेखील त्यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या. आम्ही त्यांना केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठीच्या निर्णयांची माहिती दिली. तसेच या पुढील बैठक केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली २२ फेब्रुवारीला बैठक होणार आहे.'', अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.

कृषी कायद्यांसह विविध मुद्द्यांवर केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये पहिली बैठक शुक्रवारी पार पडली. पुढील चर्चेसाठी २२ फेब्रुवारी रोजी शेतकरी नेत्यांसोबत बैठक होणार असून, ही बैठक चंडीगड अथवा नवी दिल्ली येथे होऊ शकते.

तर सरकारच्या विरोधात उपोषणाला बसलेले शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांना देखील मंत्री प्रल्हाद जोशी(Pralhad Joshi) यांनी केंद्र सरकारच्या वतीने उपोषण थांबविण्याची विनंती केली. यावर डल्लेवाल यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यावरच उपोषण थांबविणार असल्याचे सांगितले.

Pralhad Joshi on Farmers Agitation
Rahul Gandhi - Priyanka Gandhi Maha Kumbh 2025 : आता राहुल गांधी अन् प्रियंका गांधीही महाकुंभमेळ्यास जाणार अन् संगमात डुबकी मारणार!

दुसरीकडे सरकारच्या नॅशनल पॉलिसी फ्रेमवर्क फॉर ॲग्रिकल्चर मार्केटिंग (एनपीएफएएम) विरोधात शेतकरी २४ ते २६ मार्च या कालावधीत पाटणा येथे आंदोलन करण्यात येणार आहे, असे संयुक्त किसान मोर्चाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे.

Pralhad Joshi on Farmers Agitation
Jagdeep Dhankhar : सीबीआय संचालक अन् निवडणूक आयुक्तांच्या निवडीत सरन्यायाधीश कशाला हवेत? उपराष्ट्रपती धनखड यांच्या प्रश्नाचे पडसाद

गेल्या महिन्यात, संयुक्त किसान मोर्चाने रद्द केलेल्या शेती कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर वर्षभर चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते, त्यांनी ‘एनपीएफएएम’ला तीन कायद्यांपेक्षा ‘अधिक धोकादायक’ म्हणून संबोधले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com