Pralhad Joshi : '32 वर्षांपूर्वीच भावासोबतचे संबंध तोडले'! गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रल्हाद जोशींनी सगळंच सांगितलं...

FIR against Gopal Joshi BJP : प्रल्हाद जोशी यांचे बंधू गोपाळ जोशी, बहीण व पुतण्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
Pralhad Joshi
Pralhad JoshiSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : लोकसभा निवडणुकीत भाजपचे तिकीट मिळवून देण्याचे अमिष दाखवत माजी आमदाराच्या पत्नीची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर जोशींनी आपला भावाशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपण 32 वर्षांपूर्वीच त्याच्याशी संबंध तोडल्याचे त्यांनी सांगितले.

प्रल्हाद जोशी यांचे बंधू गोपाळ जोशी, बहीण आणि पुतण्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी माजी आमदाराच्या पत्नी सुनीता चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. त्यावर खुलासा करताना प्रल्हाद जोशी यांनी आपण चौकशीमध्ये कसलाही अडथळा आणणार नसल्याचे म्हटले आहे.

Pralhad Joshi
Pralhad Joshi : मोदींचे विश्वासू मंत्री प्रल्हाद जोशींना मोठा धक्का; महिलेच्या फसवणूकप्रकरणी कुटुंबीय अडचणीत

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये प्रल्हाद जोशी यांची बहीण विजयालक्ष्मी असा उल्लेख करण्यात आला आहे. पण आपल्याला एकही बहीण नसल्याचे जोशींनी म्हटले आहे. आपल्याला दोन भाऊ असून गोपाळसोबतचे संबंध 32 वर्षांपूर्वीच तोडले आहेत. त्यांच्यासोबत माझे नाव जोडले जाऊ नये, यासाठी 2013 मध्ये कोर्टासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यामध्ये आम्ही दोघे वेगळे झालो असल्याचे म्हटले होते.

मी वृत्तपत्रांमध्येही याबाबत जाहीरात दिली होती. माझे भाऊ, मित्र किंवा नातेवाईक असल्याचे सांगून एखादे काम करून देण्याचे अमिष दाखवत असेल तर त्याला मी जबाबदार नाही, असे जाहिरातीत स्पष्ट केले होते. मी पुन्हा एकदा सांगतो की, माझे भावाशी कोणत्याही प्रकारचे संबंध नाहीत, असे प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले.

Pralhad Joshi
Reservation : SC आरक्षणाबाबत हरियाणा सरकारचा मोठा निर्णय; ‘एनडीए’त वाद उफाळणार

नेमकं प्रकरण काय?

जेडीएसचे माजी आमदार देवनंद फूल सिंह चव्हाण यांच्या पत्नी सुनीता चव्हाण यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. भाजपची उमेदवारी मिळवून देतो, असे सांगत दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तिकीट न मिळाल्याने पैसे परत मागितल्यानंतर आतापर्यंत काहीच रक्कम परत केली नाही, असेही चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले आहे. कर्नाटक लोकसभा निवडणुकीदरम्यान हा प्रकार घडला आहे.  गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेसने प्रल्हाद जोशी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com