Pune Hit and Run Case : मोठी बातमी..! 'हिट अ‍ॅन्ड रन' प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल यांना अटक, कारण...

Pune Porsche Car Accident : या अपघात प्रकरणातील ड्रायव्हरला हा गुन्हा आपल्या नावावर घ्यावा, यासाठी त्यांनी दबाव टाकला तसेच त्याला डांबून ठेवल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आल्याने
 Surendra Agarwal
Surendra AgarwalSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या हिट अँड रन अपघात प्रकरणाता पुणे पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. या अपघाताला जबाबदार असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री अगरवाल यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्श गाडी चालवून हा अपघात केला होता. या अपघातामध्ये दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. हा अल्पवयीन आरोपीने दारू पिऊन भरधाव वेगाने आपल्या ताब्यातील पोर्श कार चालविली. यामध्ये दुचाकीला पाठीमागून धडक देण्यात आली. ही धडक इतकी जबरदस्ती होती की, दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीसह त्याच्याबरोबर गाडीत असलेल्या इतरांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर बाल न्याय मंडळाने अवघ्या 15 तासात या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर केला होता. त्यामुळे न्यायालय आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Surendra Agarwal
Pune Hit And Run Case : वेळेत माहिती न कळवणं भोवलं; पुणे अपघातप्रकरणी पोलिस आयुक्तांची मोठी कारवाई, दोघांचं निलंबन

या प्रकरणात पोलिसांनी या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल यांना अटक केली होती. त्यानंतर त्याचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली होती. शुक्रवारी रात्री उशीरा पोलिसांनी सुरेंद्रकुमार अगरवाल यांना अटक केली. या अपघात प्रकरणातील ड्रायव्हरला हा गुन्हा आपल्या नावावर घ्यावा, यासाठी त्यांनी दबाव टाकला तसेच त्याला डांबून ठेवल्याचे पोलिसांनी (Police) केलेल्या तपासात समोर आल्याने गुन्हे शाखेने त्यांच्यावर गुन्ह दाखल करून अटक केली आहे.

या अल्पवयीन मुलाकडून जेव्हा अपघात झाला. त्यावेळी ड्रायव्हर या मुलासोबत पुढच्या सीटवर बसला होता. हा अपघात झाल्यानंतर संबधित मुलाचे वडील विशाल अगरवाल यांनी हा गुन्हा आपल्या नावावर घ्यावा, यासाठी ड्रायव्हरला सांगितले होते. त्यासाठी त्याला पैशाचे आमिष दाखविण्यात आले होते. या अपघात (Accident) प्रकरणात पोलिसांनी वडील विशाल अगरवाल, आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल यांची चौकशी केली होती. त्यानंतर पोलिसांनी अपघाताच्या वेळी गाडीत हजर असलेल्या ड्रायव्हरला चोकशीसाठी बोलाविले होते. या चौकशीनंतर गुन्हा आपल्या नावावर घेण्यासाठी सुरेंद्रकुमार अगरवाल यांनी ड्रायव्हरवर दबाव टाकला तसेच त्याला डांबून ठेवल्याचेही चौकशीत समोर आले. त्यामुळे गुन्हे शाखेने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

 Surendra Agarwal
Chhagan Bhujbal News : अमित शाहांची पसंती तरी भुजबळांना का नाही मिळाली उमेदवारी? मोठं कारण आलं समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com