Delhi Assembly Election : मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर काही मिनिटांतच केजरीवालांचा भाजपला ‘दे धक्का’; दिल्लीत फोडाफोडी तेजीत

AAP BJP Kailash Gahlot Anil Jha Arvind Kejriwal : दिल्ली सरकारमधील गृहमंत्री कैलाश गहलोत यांनी रविवारी सकाळी आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
Arvind Kejriwal, Anil Jha
Arvind Kejriwal, Anil JhaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : दिल्लीत पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधी देशाच्या राजधानीतील राजकारण तापले असून सर्वच पक्षांनी नेत्यांची फोडाफोडी सुरू केली आहे. रविवारी सत्ताधारी आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला. गृहमंत्री कैलाश गहलोत यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पण त्यानंतर काही मिनिटांतच ‘आप’नेही भाजप नेत्याला फोडत मोठा झटका दिला.

दिल्लीतील भाजपचे नेते व माजी आमदार अनिल झा यांनी रविवारी आपमध्ये प्रवेश केला. पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत झा यांचा पक्षप्रवेश झाला. ते दिल्लीतील किराडी मतदारसंघाचे मतदारसंघाचे दोनदा आमदार होते. त्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. झा यांनी आपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्याच्या आरोग्य आणि शिक्षणाच्या मॉडेलचे कौतुक केले.

Arvind Kejriwal, Anil Jha
Rahul Gandhi : बाळासाहेब ठाकरेंविषयी मोदींकडून आव्हान; पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधींची पोस्ट चर्चेत

दरम्यान, गहलोत हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांनी राजीनामा देताना सरकारसह पक्षावरही टीका केली. दिलेली आश्वासन पुर्ण झाली नाहीत. यमुना नदी आतापर्यंतची सर्वाधिक प्रदुषित नदी बनली आहे. लोकांच्या हिताची कामे करण्याऐवजी राजकीय अजेंडा राबवला जात असल्याची टीका गहलोत यांनी केजरीवालांना लिहिलेल्या राजीनामापत्रात केली आहे.

आपकडून गहलोत यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे. खासदार संजय सिंह यांनी गहलोत भाजपची स्क्रिप्ट वाचत असल्याचे टीका केली आहे. त्यांच्यावर याआधी ईडीची रेड पडली होती. त्यामुळे त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. भाजप अशाचप्रकारे नेत्यांना तपास यंत्रणांची भीती दाखवून त्यांना आपल्या पक्षात घेत आहे. तिथे वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ करत असल्याचा निशाणा संजय सिंह यांनी साधला.

Arvind Kejriwal, Anil Jha
Kailash Gahlot : केजरीवालांना सर्वात मोठा धक्का; गंभीर आरोप करत बड्या नेत्याचा ‘आप’ला रामराम

गहलोत यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसनेही संधी साधत आप आणि भाजपवर टीका केली. काँग्रेसच्या प्रवक्त्या रागिनी नायक यांनी म्हटले आहे की, गहलोत यांचा राजीनामा म्हणजे आपसाठी झटका आहे. निवडणुकीच्या आधी नेते पक्ष बदलत असतील तर त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. या दोन पक्षांना लढत बसूद्यात, काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवेल.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com